• Thu. Sep 10th, 2026

Thorat VS Vikhe | राहुरी पोटनिवडणुकीत थोरातांचा विजयाचा दावा; राधाकृष्ण विखेंचा पलटवार

Thorat VS Vikhe | राहुरी पोटनिवडणुकीत थोरातांचा विजयाचा दावा; राधाकृष्ण विखेंचा पलटवार


#radhakrishnavikhe #rahurielection #ahilyanagar #bjp #congress #balasahebthorat राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वर्तुळात चांगलाच धुरळा उडवला आहे. खरातसोबत अनेक मंत्र्यांचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्याने वातावरण आधीच तापले असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत खळबळ उडवून दिली आहे. थोरात म्हणाले की मुख्यमंत्री स्वतः जर अशा व्यक्तीकडे जात असतील, तर सामान्य नागरिकांच्या मनात त्या ठिकाणाबाबत विश्वास निर्माण होणे स्वाभाविक आहे. लोक आपल्या अडचणी, संकटे घेऊन अशा ठिकाणी जातात. मात्र, समाजातील मोठ्या व्यक्तींच्या भेटींचा गैरफायदा घेत अशोक खरातने भोळ्या नागरिकांना, विशेषतः महिलांना फसवल्याचे चित्र समोर येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी पेटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed