MHADA Mumbai: म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे २,६४० घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ताडदेव येथील दोन घरांची किंमत सहा कोटींहून अधिक आहे. विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, घाटकोपर, माझगाव, वडाळा, अंधेरी आणि जुहू येथील घरांच्या किमतीही खासगी प्रकल्पांप्रमाणेच आहेत.
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला म्हाडाचे उपाध्यक्ष-मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी २,६४० अर्ज दाखल झाले असून, त्यांतील १६५ अर्जदारांनी अनामत रक्कम जमा केली आहे.
Gateway to Mandwa Ferry: गेटवे-मांडवा बोटसेवेत प्रवाशांची लूट, वातानुकूलित आणि खुल्या डेकसाठी समान दर; ‘पीएनपी’कडून गैरप्रकार
खासगी गृहप्रक्लपांना इतकेच दर
मुंबईतील कन्नमवारनगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थनगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरिवली, गोराई-बोरिवली, सुभाषनगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्यनगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये विविध उत्पन्न गटांसाठी ही घरे उपलब्ध आहेत. म्हाडाच्या विक्रोळीतील कन्नमवारनगरमधील हरियाली गावातील इमारत क्र. १मधील अल्प उत्पन्न गटाच्या घरांची किंमत ७५ लाख ३६ हजार रुपये इतकी आहे. याच कन्नमवारनगर भागातील इमारत क्र. २ मध्ये मध्यम उत्पन्न गटांसाठीच्या घरांच्या किंमती एक कोटी ४५ लाख ते एक कोटी ४७ लाख रुपयांपर्यंत आहेत. इथल्याच इमारत क्र. ३मध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी घरांच्या किमती एक कोटी ४५ लाख ते एक कोटी ४८ लाख रुपये एवढ्या आहेत. गोरेगाव पश्चिममधील शास्त्रीनगरमधील तृप्ती कुटीरमधील इमारत क्र. ३६मधील अल्प उत्पन्न गटासाठीच्या घरांच्या किंमती ७६ लाख ते एक कोटी ११ लाख रुपये एवढ्या आहेत. त्यापाठोपाठ गोरेगाव पश्चिमेतील तृप्ती भवन इमारत क्र. ३७ मध्ये अल्प उत्पन्न गटासाठी ८६ लाख ते ९५ लाख रुपयांपर्यंत घरांच्या किंमती निर्धारित केल्या आहेत.
किती आहेत दर?
बोरिवली पूर्वेतील राजेंद्रनगर येथील श्रद्धा सीएचएसएल येथील चाळ क्र. १ ते ४ मध्ये अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी ९३ लाख रुपये इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. घाटकोपर पूर्वेतील पंतनगरमधील अॅम्नेटी प्लॉटमध्ये अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किंमती ८५ लाख ते एक कोटी सहा लाख रुपयांपर्यंत आहेत. याच वसाहतीत मध्यम उत्पन्न गटासाठी एक कोटी १८ लाख ते एक कोटी ६५ लाख रुपयांची घरे आहेत. माझगावमधील ‘ए.एम्. रेसिडन्सी’ ‘एम.एस. अल्फा माना रिअॅल्टर्स’ एक कोटी ते एक कोटी ३६ लाख रुपये एवढ्या रकमेची घरे आहेत. वडाळ्यातील संघवी हाईट्समध्ये अल्प उत्पन्न गटासाठी एक कोटी ५१ लाख ते एक कोटी ५३ लाख रुपयांपर्यंत घरे उपलब्ध आहेत.
Mumbai Local: रात्री परतीच्या प्रवासात मुंबईकरांची रखडपट्टी, CSMT-कुर्ला, ठाणे अनेक फेऱ्या रद्द; शेवटच्या लोकलमध्येही बदल
अंधेरीतील मानस सीएचएसएल इमारत क्र. ३१ डी.एन. नगरमधील अल्प उत्पन्न गटासाठीच्या घरासाठी एक कोटी ३० लाख रुपये आहे. जुहूतील जेव्हीपीडीमधील आयडियल अपार्टमेंट मध्यम उत्पन्न गटातील घराची किंमत दोन कोटी १७ लाख रुपये एवढी आहे. अंधेरी पूर्वेतील स्वामी नित्यानंदनगरमधील नित्यानंदनगर चार येथे मध्यम उत्पन्न गटासाठी एक कोटी ५८ लाख रुपये किंमत ठेवण्यात आली आहे.
