Mumbai Crime: आधीच युद्धामुळे गॅसची टंचाई असताना गॅस कनेक्शन बंद केलं गेलं तर पंचाईत होईल, असा विचार करून सदर व्यावसायिकाने १ हजार १५० रुपये बिल भरले होते.
Cyber fraud(फोटो– BCCL – Non Copyright)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फायदा सायबर चोरांकडून पुरेपूर घेतला जात आहे. गॅस बिल भरले नाही, अपडेट झाले नाही, असे संदेश पाठवून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशातच मुलुंडच्या व्यावसायिकाकडून १,१०० रुपयांच्या बिलासाठी १२ लाख रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या मोबाइलवर गुरुवारी एक संदेश आला. तत्काळ गॅस बिल भरा, अन्यथा गॅस कनेक्शन तोडण्यात येईल, असे या संदेशात नमूद करण्यात आले होते. आधीच गॅस टंचाई त्यात गॅस कनेक्शन बंद करण्यात आले तर पंचाईत होईल, असा विचार करून व्यावसायिकाने १,१५० रुपये बिल भरले. काही वेळाने त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. त्याने महानगर गॅस कंपनीतून बोलत असल्याचे सांगत बिलाबाबत विचारणा केली. यावर व्यावसायिकाने काही वेळापूर्वी बिल भरल्याचे सांगितले. समोरील अधिकाऱ्याने बिल अपडेट झाले नसल्याचे सांगितले. बिल अपडेट करण्यासाठी एक एपीके फाइल पाठवली.
व्यावसायिकाने एपीके फाइलवर क्लिक करून ज्या बँक खात्यामधून बिल भरले त्याचा तपशील टाकला. सबमिट करण्यासाठी त्यांना एक ओटीपी आला. त्यांनी हा ओटीपी टाकताच त्यांच्या बँक खात्यामधून सुमारे १२ लाख रुपये परस्पर वळविण्यात आले. पैसे जात असल्याचे संदेश येताच व्यावसायिकाने बँकेत संपर्क साधला आणि पुढील व्यवहार बंद केले. ही सायबर फसवणूक असल्याचे कळताच त्यांनी याबाबत पूर्व विभाग सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा