• Sat. Jun 6th, 2026

    Solapur News : ‘मी तुमच्या लायकीचा बाप नाही’; मुलाला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केला अन् वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, सोलापूरमध्ये हळहळ

    Solapur News : ‘मी तुमच्या लायकीचा बाप नाही’; मुलाला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केला अन् वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, सोलापूरमध्ये हळहळ

    सोलापुरात जुगाराच्या व्यसनामुळे सर्वस्व गमावलेल्या एका पित्याने कंबर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मुलाला पाठवलेला “मी तुमच्या लायकीचा वडील नाही” हा भावनिक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व्हायरल झाला असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

    सोलापुरात बापाची आत्महत्या, मुलाला पाठवला शेवटचा मेसेज(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर: जुगारात सर्व काही हरलेल्या हताश बापाने मोठ्या मुलाला शेवटचा व्हाटसअप मेसेज करून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मुलाला व्हॉट्सअॅपवर एक शेवटचा मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये त्यांनी आपल्या वाईट सवयी आणि जुगाराच्या व्यसनाचे कारण सांगितले आहे. अनिल मारुती नरवडे(वय 57 वर्ष,रा मुरारजी पेठ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. मला माफ कर, मी तुमच्या लायकीचा वडील ठरू शकलो नाही, एका हताश बापाने मुलाला केलेले व्हाट्सअप चॅटिंग सोलापुरात वायरल झाले आहे. हा वायरल मेसेज पाहून सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल नरवडे यांनी 28 मार्च रोजी शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सोलापूर विजयपूर महामार्गावर असलेल्या छत्रपती संभाजी तलावात (कंबर तलाव) उडी जीवनयात्रा संपवली आहे.

    मुलाला शेवटचा मेसेज केलं अन् आत्महत्या केली

    शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी माहिती देताना सांगितले, अनिल नरवडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मुलाला व्हॉट्सअॅपवर एक शेवटचा मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये त्यांनी आपल्या वाईट सवयी आणि जुगाराच्या व्यसनाचे कारण सांगितले आहे.

    अनिल नरवडे यांनी मुलाला केलेला तो मेसेज

    “अनु, मी जे काही बोलत आहे ते माझ्या मजबुरीमुळे बोलत आहे, त्यामुळे तू रागावू नकोस. मी मुळात वाईट असल्यामुळेच हे सर्व घडत आहे. मी जुगारी असल्यामुळे आजवर हे सर्व घडत गेले आहे. आपली गाडी मी कुठे गहाण ठेवली आहे, हे तुला सांगून लक्षात येणार नाही. त्यामुळे राहुल कोळी याला सोबत घेऊन जा. मी कुठे जुगार खेळत होतो, हे त्याला माहित आहे. तिथे मी ३०,००० रुपयांत गाडी गहाण ठेवली आहे, ती सोडवणे आता तुझे काम आहे.

    Maharashtra TimesMumbai News : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMCचा निर्णय; मूर्तिकारांना मोफत मंडप जागा, शाडू माती, ऑनलाइन परवानगी मिळणार

    कृष्णा, मी माझ्या सर्व जबाबदाऱ्यांचे ओझे तुझ्यावर सोडून जात आहे, कारण मी तुमच्या लायकीचा वडील राहिलो नाही. मी वाईट मार्गाला लागलो असल्यामुळे कधीच सुधारू शकलो नाही. तुम्ही मात्र माझा मार्ग कधीच धरू नका, कारण माझा मार्ग कधीच चांगला ठरला नाही. म्हणूनच मी आता हा शेवटचा मार्ग निवडत आहे. तू फक्त भैय्या, आई आणि तुझ्या मम्मीचा सांभाळ कर. माझी अपेक्षा फक्त तुझ्याकडूनच आहे आणि मला खात्री आहे की तू माझ्या शब्दाचे पालन करशील.

    मला माफ कर, मी तुमच्या लायकीचा वडील ठरू शकलो नाही. ही माझी शेवटची इच्छा समजून तू आई, भैय्या आणि तुझ्या मम्मीचा सांभाळ कर. मी शेवटच्या क्षणी तुझ्याकडे काहीतरी मागत आहे, मला खात्री आहे की तू माझी ही इच्छा पूर्ण करशील. मी तुमच्या विश्वासावर तुम्हाला सोडून निरोप घेत आहे, कारण मी स्वतःला तुमचा वडील किंवा पप्पा म्हणवून घेण्याच्या लायकीचा उरलो नाही.”

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा