• Wed. Jul 1st, 2026

    हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 27, 2026
    हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद

    हुंडामुक्ती चळवळीचे पालकमंत्र्यांकडून विशेष अभिनंदन

    सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ (Dowry Prohibition Act, 1961 बाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणेसाठी तयार करण्यात आलेल्या घडीपुस्तिकेचे अनावरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, यांच्या हस्ते आज करण्यात आले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात या घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील आदि उपस्थित होते.

    हुंडा घ्यायचा नाही व हुंडा द्यायचा नाही  हा विचार समाजात रुजवण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न  हुंडामुक्ती अभियान – टप्पा  १ राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रकल्पनिहाय सर्व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत हुंडा न घेता विवाह केलेल्या जोडप्यांची माहिती घेवून लग्नावेळी लग्नातील दोन्ही पालकांकडून हुंडा न घेतल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र घेवून त्यांना या अभियानात समाविष्ठ करण्यात आले. ज्या कुटुंबामध्ये हुंडा दिला नाही अथवा घेतला नाही अशा ११६७ कुटुंबांनी प्रतिज्ञापत्र दिले. या सर्व कुटुंबांचा व अशी संकल्पना राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विशेष अभिनंदन केले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed