• Mon. Jun 15th, 2026

    Narhari Zirwal: विधिमंडळात काँग्रेसच्या दिवंगत नेत्याने २२ वर्षांपूर्वी केलेलं खळबळजनक वक्तव्य; नरहरी झिरवाळ प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत!

    Narhari Zirwal: विधिमंडळात काँग्रेसच्या दिवंगत नेत्याने २२ वर्षांपूर्वी केलेलं खळबळजनक वक्तव्य; नरहरी झिरवाळ प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत!

    Congress Vilaskaka Undalkar: मुंबईत असले की विलासकाका उंडाळकरांचा मुक्काम शक्यतो आकाशवाणी आमदार निवासातच असे. निर्व्यसनी, निष्कलंक आणि स्वच्छ चारित्र्यामुळे त्यांचा विधिमंडळात दरारा होता.

    विधिमंडळात काँग्रेसच्या दिवंगत नेत्याने २२ वर्षांपूर्वी केलेलं खळबळजनक वक्तव्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरच्या आमदार निवासात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वादग्रस्त घटना घडल्या आहेत. सध्या गाजत असलेल्या मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित प्रकरणामुळे २२ वर्षांपूर्वी साताऱ्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकरांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याची आठवण ताजी झाली आहे. ‘आमदार निवास वेश्यांचा अड्डा बनलं आहे. आमदार निवासात गर्दुल्ले खुलेआम वावरत आहेत’, असा बॉम्बच उंडाळकरांनी टाकला होता.

    माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर हे २००३-०४ मध्ये सहकार आणि वस्त्रोद्योग मंत्री होते. तत्कालीन आघाडी सरकारच्या टर्ममधील अखेरचे अधिवेशन मुंबईत होते. त्या अधिवेशनात विलासकाका उंडाळकरांनी आमदार निवासातील गैरकृत्यांचा पाढाच वाचला होता. आमदार निवास वेश्यांचा अड्डा बनलं आहे. सगळीकडे गर्दुल्ले फिरत आहेत. सुरक्षेचा पत्ताच नाही. लोकप्रतिनिधी रात्री अपरात्री झुकांड्या देत येतात, असा खळबळजनक दावा उंडाळकरांनी केला होता. ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. विलासकाकांनी २२ वर्षांपूर्वी जे सांगितले होते, ते खरे ठरले आहे.

    मुंबईत पूर्वी आकाशवाणी हे एकमेव सरकारी आमदार निवास होते. १९९० च्या उत्तरार्धात नरिमन पॉईंट परिसरात मनोरा आमदार निवास बांधण्यात आले. विलासकाका उंडाळकरांनी केलेलं वक्तव्य हे आकाशवाणी आमदार निवासातील भानगडींच्या संदर्भात होते. कारण, ते १९८० पासून आमदार होते. त्यामुळे आकाशवाणी आमदार निवासातील खडानखडा माहिती त्यांना होती.

    विलासकाका पुस्तकप्रेमी होते. त्यांना वाचनाची आवड होती. त्यामुळे रात्री दोनपर्यंत ते वाचन करायचे. त्यांच्या रूमची लाईट सुरू असली की काका अजून जागे आहेत, हे सर्वजण ओळखायचे. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी दबकत यायचे. तरीही विलासकाकांना त्यांच्या खास सूत्रांकडून सर्व माहिती मिळायची. कोण कधी आला, कोणत्या अवस्थेत होता, बरोबर कोण होतं, याची सर्व जंत्रीच त्यांच्याकडे असायची. त्याच माहितीच्या जोरावर विलासकाकांनी २००४ साली केलेल्या वक्तव्याने संपूर्ण विधिमंडळात भूकंप झाला होता.

    आमदार निवासातील काही ठळक घटनांच्या नोंदी

    मुंबईतील आकाशवाणी, मनोरा आणि नागपूरच्या आमदार निवासात गेल्या काही वर्षात अनेक धक्कादायक घटना घडलेल्या आहेत. २०१२ मध्ये तत्कालीन आमदार बबन शिंदे यांच्या खोलीत तरूणीने आत्महत्या केली होती. २०१३ मध्ये आकाशवाणी आमदार निवासातील जयप्रकाश दांडेगावकरांच्या खोलीत एकाचा मृतदेह आढळून आलेला. सामूहिक बलात्कार पीडित तरूणीने २०१७ मध्ये नागपूरच्या आमदार निवासात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शिक्षकांच्या आंदोलनासाठी आल्यानंतर एका शिक्षकाने आकाशवाणी आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २०२० मध्ये घडली होती. मद्यपी टोळक्याने अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दारूसाठी ५०० रुपये मागितले होते. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दारूड्यांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील आमदार निवासात रात्री बाटल्यांचा खच आढळून येत असल्याची तक्रार केली होती.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा