• Sat. Jun 20th, 2026

    Satara Politics : ‘मंत्री जयकुमार गोरेंच्या सांगण्यावरून आमचे अपहरण’, ZP सदस्यांचा खळबळजनक आरोप

    Satara Politics : ‘मंत्री जयकुमार गोरेंच्या सांगण्यावरून आमचे अपहरण’, ZP सदस्यांचा खळबळजनक आरोप

    सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी झालेल्या नाट्यात आता पुन्हा ट्विस्ट येताना दिसत आहे. कारण जिल्हा परिषदेच्या ज्या दोन सदस्यांना मतदान न करु देता पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्या दोघांची जामिनावर सुटका झाली आहे. तसेच दोघांनी पत्रकार परिषद घेत मंत्री जयकुमाक गोरे यांच्यावर आरोप केले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांना अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांनी नाट्यमयरित्या अटक केली होती. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. “मंत्री जयकुमार गोरे यांच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी आमचे अपहरण केले होते. महाबळेश्वरच्या घाटात आमचा एन्काऊंटर करण्याचा पोलिसांचा डाव होता”, असा खळबळजनक आरोप जि. प. सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी केला.

    अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, “मतदानाच्या दिवशी आम्ही जिल्हा परिषदेच्या सभागृहाकडे निघालो होतो. त्यावेळी पालकमंत्री स्वतः आमच्याबरोबर होते. आम्ही चौथ्या मजल्यावर गेलो असता तिथे साध्या वेशातील शंभर पोलीस उभे होते. त्यांनी अचानक आम्हाला ताब्यात घेऊन फरफटत नेले. जिल्हा परिषदेच्या मागच्या इमारतीमधील एका अरुंद पॅसेजमध्ये उभ्या असलेल्या गाडीत घालून महाबळेश्वरच्या दिशेने नेले.”

    “ज्या सदस्याच्या अपहरणाची तक्रार होती त्या बापूसाहेब शिंदे यांनी स्वतः महाबळेश्वर आणि वाई पोलीस ठाण्यात जाऊन आपले अपहरण झाले नसल्याचा जबाब दिला. तरीही गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे सातारा पोलिसांनी हे सर्व पूर्व नियोजित पद्धतीने केले. आम्हाला पोलीस महाबळेश्वरला घेऊन जात असताना मंत्री जयकुमार गोरे यांचा पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांना सारखा फोन येत होता”, असा खळबळजनक दावा देसाई आणि मांडवे यांनी केला.

    “सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी त्यांच्या राजकीय बॉसचा फोन आल्यानंतर अर्धे काम फत्ते झाले असल्याचे त्यांना सांगितले. पोलीस आमचा महाबळेश्वर घाटात एन्काऊंटर करतील, अशी आम्हाला भीती होती. पोलीस आम्हाला ताब्यात घेतील असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र पोलिसांनी राजकीय नेत्यांच्या संगनमताने लोकशाहीचा गळा घोटला आहे”, असा थेट आरोप त्यांनी केला.

    “आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या कटाचे खरे सूत्रधार मंत्री गोरे आहेत. यापुढेही आमच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे प्रशासनाला आम्ही निवेदन देणार आहोत. बापूसाहेब शिंदे यांचे चिरंजीव विकास शिंदे याला पाचवडच्या टोल नाक्यावर कोणी आणले? तेथे काय प्लॅन शिजला ? तेथे कोणाला काय दिले? याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे असून ते आम्ही कोर्टात सादर करणार”, असा इशारा अनिल देसाई यांनी दिला.

    “वाई कोर्टाने आम्हाला जामीन मंजूर करताना एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आमच्यावर भविष्यात खोटे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांवर सुमोटो गुन्हे दाखल करावेत आणि जिल्हा परिषद इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासाच्या दृष्टीने उपलब्ध व्हावे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडी रद्द करून फेर निवडी करण्यात याव्या, यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत”, असं अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी सांगितले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा