• Sat. Jul 4th, 2026

    केवळ 5 हजारच्या EMI वर दारात आणा चारचाकी

    ByMH LIVE NEWS

    Mar 24, 2026
    केवळ 5 हजारच्या EMI वर दारात आणा चारचाकी

    मुंबई

    कार खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. आपल्या दारी चार चाकी असावी असे प्रत्येकाला वाटते. काही जणांचे हे स्वप्न लवकर पूर्ण होते. तर काही जणांना वेळ लागतो. जर तुमच्याकडे कार खरेदी करण्यासाठी संपूर्ण रक्कम नाही तर तुम्ही कार ईएमआयवर देखील खरेदी करु शकता. त्यामुळे तुम्हाला कार खरेदी करण्यासाठी एवढी मोठी रक्कम जमा करण्याची गरज नाही. केवल महिन्याला निश्चित EMI भरुन तुम्ही कार आपल्या घरी घेऊन जाऊ शकता.

    जर तुम्हाला किमान पाच हजार रुपये महिना ईएमआयवर कार खरेदी करण्याची इच्छा आहे तर तुम्हाला एखादी एन्ट्री लेव्हर कार खरेदी करावी लागेल. चला तर आम्ही तुम्हाला भारतीय बाजारातील सध्या उपलब्ध असलेल्या प्रसिद्ध कारचे ईएमआय किती पडतील याची माहीती देणार आहोत. चला माहिती घेऊयात….

    Maruti S-Presso

    मारुतीची Maruti S-Presso ही कार उत्तम आहे. नोएडात हीची ऑन-रोड किंमत ३.९४ लाख रुपयांच्या आसपास आहे. जर तुम्हाला या कारला खरेदी करायचे असेल तर जर तुम्ही ५० हजार रुपये डाऊनपेमेंट केले तर ९.८ टक्के व्याजाने दराने चार वर्षांसाठी ८,६९७ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. जर हे कर्ज तुम्ही सात वर्षांसाठी घ्याल तर तुम्हाला ५,६७९ रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल.

    Renault Kwid

    Renault Kwid च्या ऑटोमेटिक पेट्रोल व्हेरिएंडची ऑन रोड किंमत ४.८२ लाख रुपये आहे. १ लाख डाऊन पेमेंट दिल्यानंतर ही कार ९.८ टक्के व्याजदराने खरेदी कराल तर तुम्हाला दर महिन्याला ४ वर्षांसाठी ९ हजार ५५६ रुपयांचा EMI भरायला लागेल. तसेच ७ वर्षांसाठी लोनचे ईएमआय ६,१९४ रुपये होईल.

    Tata Tiago

    तिसरी कार टाटा टियागो Tata Tiago आहे. या कारची ऑन रोड किंमत ५.३५ लाख रुपये आहे. जर तुम्ही चार वर्षांसाठी ९.८ टक्के व्याजदराने कर्ज घेतले असेल तर ईएमआय १२, २७० रुपये होईल तर सात वर्षांसाठी लोन घेतले तर ईएमआय ८ हजार रुपयांच्या आसपास होईल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed