• Wed. Jun 17th, 2026

    Accident News: सांगलीत भीषण अपघात, कार थेट ट्रॅक्टर ट्रॉलीखाली घुसली; वकील महिलेसह पतीचाही जागीच मृत्यू, घटनेनं हळहळ

    Accident News: सांगलीत भीषण अपघात, कार थेट ट्रॅक्टर ट्रॉलीखाली घुसली; वकील महिलेसह पतीचाही जागीच मृत्यू, घटनेनं हळहळ

    Sangli Accident: ट्रॅक्टर चालक चहा पिण्यासाठी हॉटेलवर थांबला असता एक कार थेट ट्रॉलीखाली घुसल्याची घटना घडली. या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

    कारला भीषण अपघात, थेट ट्रॅक्टर ट्रॉली घुसली; वकील महिलेसह पतीचाही जागीच मृत्यू, घटनेनं जिल्ह्यात हळहळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सांगली: सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात असलेल्या शिरढोण गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले दाम्पत्य मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असून 38 वर्षीय वंदना संतोष गायकवाड आणि 45 वर्षीय संतोष धोंडीराम गायकवाड (, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) अशी पती-पत्नीची नावे आहेत. वंदना गायकवाड या कोल्हापूर जिल्हा न्यायालयात वकील म्हणून काम करत होत्या.

    याबाबतची सविस्तर माहिती अशी की, संतोष गायकवाड आणि त्यांची पत्नी वंदना गायकवाड हे त्यांच्या कारने कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने जात होते. मात्र कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर पोहोचल्यानंतर विपरीत घडना घडली. गायकवाड यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर आणि त्याच्या दोन ट्रॉलींना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातग्रस्त ट्रॅक्टरचा चालक आणि कामगार चहा पिण्यासाठी जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. कार आणि ट्रॅक्टरची धडक अत्यंत भीषण असल्यामुळे कार ट्रॉलीखाली अडकली. या अपघातात कारमधील गायकवाड पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

    दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस आणि कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे पथक तातडीने अपघातस्थळी पोहचले. पोलिसांनी तिथे मदतकार्य करत अपघातग्रस्त कार आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला हटवून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. यावेळी पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. तसंच गायकडवा दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा