अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असल्याचे संकेत मिळत आहेत. अशोक खरात याने 5 नरबळी घेतल्याचा देखील संशय सरकारी वकिलांकडून कोर्टात व्यक्त करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरात याला एसआयटीच्या पथकाने नाशिक न्यायालयात हजर केलं. यावेळी सरकारी वकिलांनी महत्त्वाचे मुद्दे आपल्या युक्तिवाद मांडले. अशोक खरात याने 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या पिस्तूलातून 5 गोळ्या मिसिंग आहेत. त्यामुळे त्याने 5 नरबळी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सरकारी वकिलांनी कोर्टात आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मांडत त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. यानंतर कोर्टाने अशोक खरातला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
“आरोपीच्या घराच्या झडतीत राजमुद्रा मिळाल्या आहेत. त्याने पिस्टलच्या माध्यमातून 5 नरबळी दिल्याचा संशय आहे, त्याचे पुरावे मिळाले आहेत. मालमत्ता कागदपत्रे मिळाले आहेत. अनेकांना त्याने फसविले आहे, त्याच्या तक्रारी पुढे आहेत. आरोपी 67 वर्षाचा आहे. तो 30 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतांना व्हिडीओत दिसतो. त्याचे पिस्टल जप्त केले आहे. त्यात 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय आहे”, अशी माहिती सरकारी वकिलांनी युक्तिवादात दिली.
“अशोक खरातने खडे कुठून आणले, जे मिश्रित पाणी द्यायचा ते कुठून आणले, 21 जीवंत काडतुसे सापडले, तर 5 वापरलेले जिवंत काडतुसे सापडले आहेत. तो कस्तुरी वापरत होता. ते हरणाची शिकार करून आणली का? त्याचा तपास करायचा आहे. पीडित महिलांची संख्या वाढत आहे. त्यानुसार पोलीस कोठडी हवी आहे. राज्यात अघोरी कृत्याचा कायदा असताना आरोपी ते कृत्य करत होता”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला.
“आरोपी अशोक खरातकडे प्राण्यांची कातडी, पांढरी कस्तुरी, काळी कस्तुरी आढळून आली होती. तसेच फॉर्म हाऊसमध्ये संपत्ती बाबतचे कागदपत्रे आढळून आले आहेत. त्याचबरोबर DVR देखील मिळून आला आहे. या DVR मध्ये काय होते का? हा DVR फॉर्म हाऊस येथे आणण्यात आला होता”, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली.
आरोपीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?
“पोलिसांकडे 7 दिवस होते. ते आपला तपास पूर्ण का करु शकले नाहीत? जे घडत आहे त्याबाबत वाघाची कातडी, बंदूक आणि कस्तुरी बाबतचे प्रश्न मला विचारले नाही. अशोक खरात पूजा विधी करत होते. पण जादूटोना करत नव्हते”, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
अत्याचार आणि फसवणुकीचे जाळे
तपासाधिकारी किरण सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले आहे की, पीडित महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ६७ वर्षांचा आरोपी ३० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करतानाचे पुरावे समोर आले आहेत. खरात याच्या घरात राजमुद्रा आणि अनेक मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. त्याने संमोहनाच्या जाळ्यात ओढून अनेकांना आर्थिकरित्या फसविले आहे. अघोरी कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई सुरू आहे. या गुन्ह्याची पाळमूळ शोधण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात २९ मार्च पर्यंत सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडी दरम्यान पोलिस तपासत आणखी काय समोर येते? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा