• Sun. Jun 7th, 2026
    24 वर्षीय मुलाच्या मित्राशी 48 वर्षीय आईचे अनैतिक संबंध, घरातून पळाले, नागपुरातील गावात चर्चा, दृष्टीहीन पतीचा टोकाचा निर्णय

    Nagpur Woman fled with Son’s Friend : दाम्पत्याच्या २४ वर्षीय मुलाचा मित्र घरी यायला लागल्यानंतर आईचे मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : पोटच्या २४ वर्षीय मुलाच्या मित्रासोबत ४८ वर्षीय आईने पलायन केले. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. पत्नीने आपल्याच मुलाच्या मित्रासोबत पलायन केल्याचा जबर धक्का ५५ वर्षीय दृष्टिहीन पतीला बसला. त्याने विष प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.

    काय घडलं नेमकं?

    प्राप्त माहितीनुसार, ५५ वर्षीय इसमाला २४, २६ व २८ वर्षीय तीन मुले आहेत. मिळेल ते काम करून हा इसम पत्नीच्या मदतीने कुटुंबाचा गाडा हाकायला लागला. एकदा श्रम करताना दगड उसळला. तो डोक्याला लागल्याने त्याच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. त्यामुळे काम जमत नव्हेत. तो घरीच राहायला लागला.
    Maharashtra TimesCrime News : रुग्णालयात लिफ्टच्या दरवाजात अडकला, पत्नी-मुलासमोरच तडफडून प्राण सोडले, वाढदिवसानंतर पहाटेच करुण अंत

    मुलाच्या मित्राशी अनैतिक संबंध

    दरम्यान, दाम्पत्याच्या २४ वर्षीय मुलाचा मित्र घरी यायला लागला. आईचे मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. या संबंधाची गावात चर्चा सुरू झाली. एके दिवशी संधी साधून ही ४८ वर्षीय महिला मुलाच्या मित्रासोबत पळून गेली. काही दिवस त्याच्यासोबत राहून गावी परतली. पतीने मोठ्या मनाने तिचा स्वीकार केला. काही दिवस दोघेही शांत राहिले. मात्र, त्यानंतर तो मुलगा व या महिलेचे प्रेम पुन्हा फुलले. ते सतत भेटायला लागले. त्यांची समजूत घालूनही काही फायदा झाला नाही.

    कॅप्टन खरातसोबत शिंदेंचे फोटो व्हायरल; राऊतांच्या आरोपांनंतर दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण

    दृष्टीहीन पतीचा टोकाचा निर्णय

    आठ दिवसांपूर्वी मुलाच्या आईने मित्रासोबत पुन्हा पलायन केले. याबाबत पुन्हा गावात चर्चा सुरू झाली. दृष्टिहीन पतीने पत्नी घरी परत यावी, यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, त्याला यश आले नाही. पत्नी घरी परत न आल्याने हताश होऊन पतीने विष प्राशन केले. त्याची प्रकृती बिघडल्याने तातडीने उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. महिलेचा पती मृत्यूशी झुंज देत आहे.
    Maharashtra TimesCrime News : बँकॉकहून परत आला, तरुणाची बॉडी टॉयलेटजवळ सापडली, अंगावर एकही कपडा नाही, हातातील कंडोमच्या पाकिटामुळे संशय
    दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणीही तक्रार केली नसल्याची माहिती भिवापूर पोलिसांनी दिली. प्रकरणाचा तपास सुरू आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत याबाबतचा अधिक तपशील मिळू शकला नव्हता.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा