• Sun. Jun 14th, 2026

    संगीतामुळे जगणे सुंदर होते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 22, 2026
    संगीतामुळे जगणे सुंदर होते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नागपूर, २२ मार्च : संगीतकार आणि गायकांनी आपले जगणे सुंदर केले, इतकी शक्ती संगीतात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांचे वितरण आज सायंकाळी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
    देशातील महत्त्वाच्या पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना पुरस्काराचा समावेश होतो, असेही मुखमंत्र्यांनी सांगितले.

    वारकरी परंपरेतील अभिजात संगीत आणि शास्त्रीय गायनावर हुकूमत गाजविणारे युवा कलाकार शरयू दाते, ऋषिकेश करमरकर यांना यावेळी गौरविण्यात आले. याशिवाय प्रसिद्ध पार्श्वगायक शान यांना आयकॉन, प्रसिद्ध संगीतकार अन्नू मलिक यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंडित अजय पोहनकर यांना लेनंड, तर बालप्रतिभा पुरस्कार निशांत गुप्ता यांना देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,  पार्श्वगायक रुपकुमार राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा होते.
    याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रीयन ऑफ इयर आउटस्टँडिंग पॉलिटिशियन या पुरस्काराने गौरविण्यात आले.


    मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, लोकमतचे प्रबंध संचालक देवेंद्र दर्डा यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed