Mumbai Accident : चालकाला धोका असल्याची जाणीव असूनही “जाणूनबुजून आणि बेपर्वाईने” प्रवाशांना गाडीने चिरडले, असा आरोप आहे
नेमकं काय घडलं होतं?
२९ डिसेंबर २०२५ च्या रात्री ९.३० ते ९.४० वाजताच्या दरम्यान भांडुप रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. ५२ वर्षीय आरोपी बस चालक संतोष सावंत याने जाणूनबुजून आणि उद्देशपूर्वक बेस्ट इलेक्ट्रिक बसचा हत्यारासारखा वापर करुन पोलिस चौकीच्या मागच्या वळणावरुन वेगाने गाडी दामटवली आणि थांब्यावर वाट पाहणाऱ्या प्रवाशांना धडक दिली, असा दावा मुलुंड येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.
जाणूनबुजून आणि बेपर्वाईने
रात्रीच्या गस्तीवर असलेले तक्रारदार बीट मार्शल सुधीर पाटील यांनी सांगितलं की, त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वेगाने बस येत असल्याचं पाहिलं आणि काही क्षणातच मोठा अपघात झाला. चालकाला धोका असल्याची जाणीव असूनही “जाणूनबुजून आणि बेपर्वाईने” प्रवाशांना गाडीने चिरडले, असा आरोप त्यांनी आपल्या जबाबात केला.
Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार, 43 वर्षीय चुलत दिराला दहा वर्ष सक्तमजुरी, बारामती कोर्टाचा निकाल
तपास अधिकारी पीएसआय संतोष चाटे यांनी सांगितलं की, संतोष सावंत याला त्याच्या कृत्यामुळे इतरांचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत होण्याची जाणीव असूनही त्याने गाडी चालवली. धडकेमुळे बस स्टॉपचा खांब वाकला आणि अनेक जण बसखाली अडकले. जखमींना राजावाडी आणि मुलुंड रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तीन महिला आणि एक पुरुष अशा चौघांना मृत घोषित करण्यात आलं.
Nagpur News : नातवाने पिचकारी मारली, आजीने चिडून उकळतं पाणी फेकलं, नागपुरात चार वर्षांचा चिमुकला भाजला
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
संतोष सावंत याच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार बेपर्वाईने वाहन चालवण्यासोबतच गंभीर दुखापत आणि जीवास धोका निर्माण केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे, रुग्णालयातील नोंदी, फॉरेन्सिक निष्कर्ष, आरटीओ तपासणी अहवाल आणि सायन रुग्णालयात केलेल्या मानसिक आरोग्य मूल्यांकनांवरुन निष्कर्ष काढला आहे. अंतिम मानसिक चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.
Nitin Gadkari | मुंबई, बंगळुरु प्रवाशांसाठी खूशखबर, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
