Beed Car Accident Man Death : गाडीचा वेग इतका प्रचंड होता की, चालकाचे नियंत्रण सुटल्याबरोबर कारने रस्त्यावरच तीन ते चार पलट्या घेतल्या
बीड शहरातील रामतीर्थ परिसरातील रहिवासी असलेला कृष्णा जालिंदर मुळे (वय २२) हा आपल्या काही मित्रांसोबत धुलिवंदन साजरा करण्यासाठी शेजारील जिल्ह्यातील एका रिसॉर्टवर जाण्याचे नियोजन करून निघाला होता. या सहलीसाठी मित्र परिवाराने व्हेरना आणि थार अशा दोन अलिशान गाड्यांचा वापर केला होता.
सोमवारी पहाटेच्या सुमारास हे सर्व जण बीडहून शिरूर कासारमार्गे निघाले होते. प्रवास सुरू असताना नागऱ्याची वाडीजवळ पोहोचल्यावर व्हेरना कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की, चालकाचे नियंत्रण सुटल्याबरोबर कारने रस्त्यावरच तीन ते चार पलट्या खाल्ल्या. अनियंत्रित झालेली ही कार शेतातील एका विहिरीच्या दिशेने वेगाने गेली. विहिरीच्या सिमेंटच्या कठड्याला जाऊन जोरदार धडकली आणि कठड्याला लटकली.
एकाचा मृत्यू, तिघे गंभीर
या भीषण धडकेत कृष्णा जालिंदर मुळे या तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत कारमध्ये असलेले प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक मित्र असे तिघेजण जखमी अवस्थेत पडले होते. त्यांच्या पाठीमागून ‘थार’ गाडीत येत असलेल्या मित्रांनी अपघात पाहताच तात्काळ धाव घेतली आणि जखमींना गाडीबाहेर काढले.
Crime News : ट्रक चालकावर जीव जडला, सिने अभिनेत्रीने लिव्ह इन पार्टनरला व्हायग्रा पाजून संपवलं, बारा दिवसांनी उलगडा
जखमींपैकी प्रसाद खोले याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर यश पेंढारे आणि त्यांच्या दुसऱ्या एका मित्रावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nitin Gadkari | मुंबई, बंगळुरु प्रवाशांसाठी खूशखबर, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
कार विहिरीच्या कठड्यावर लटकली
हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. मात्र, नशिबाने कार विहिरीच्या कठड्याला धडकून थांबली. जर कार कठडा तोडून थेट विहिरीत कोसळली असती, तर पाण्याची खोली आणि अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता होती. विहिरीच्या कठड्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी एका तरुणाला मात्र आपला जीव गमवावा लागला आहे.
Crime News : व्हेज बिर्याणी शॉपच्या फ्रीजरमध्ये तरुणाची बॉडी, दोन्ही चपलांमुळे संशयाला जागा, मोबाईलमुळे ओळख पटली
परिसरात शोककळा
कृष्णा मुळे याच्या निधनाची बातमी बीड शहरात आणि विशेषतः रामतीर्थ परिसरात समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. धुलिवंदनाचा सण असतानाच एका तरुण मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले आहे. भरधाव वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
