• Mon. Sep 7th, 2026

नाशिक शहरात उद्यापासून चौथे विश्व मराठी संमेलन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 25, 2026
नाशिक शहरात उद्यापासून चौथे विश्व मराठी संमेलन – महासंवाद

नाशिक, दि. २५ (जिमाका) : नाशिक येथे २७ व २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात चौथे विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी संयोजकांनी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिली असून नाव नोंदणीसाठी इच्छुकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

चौथ्या विश्व मराठी संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कविवर्य कुसुमाग्रज नगरीत विविध मंच उभारण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी भाषा विभागाने देश- विदेशातून येणाऱ्या मराठी भाषिक प्रेमींना नाव नोंदणीसाठी ऑनलाइन लिंक https://vishwamarathisammelan.com  उपलब्ध करून दिली आहे. या लिंकवर जाऊन इच्छुक नाव नोंदणी करू शकतात. जास्तीत जास्त नागरिकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed