• Wed. Jul 1st, 2026

    मी हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधान मेले असते- ट्रम्प

    ByMH LIVE NEWS

    Feb 25, 2026
    मी हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधान मेले असते- ट्रम्प

    मुंबई

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. ‘मी पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा जीव वाचवला’ असा नवीन दावा ट्रम्प यांनी केला आहे. ‘मी हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधान मेले असते’ असं ट्रम्प म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धावरुन ट्रम्प यांनी हा दावा केल्याचं म्हटलं जातय. वर्ष 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सैन्य तणावादरम्यान आपल्या कूटनितीक हस्तक्षेपाने पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा जीव वाचला असा दावा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ‘मी हस्तक्षेप केला नसता, तर परिस्थिती गंभीर बनली असती’ असं ट्रम्प म्हणाले. “त्यावेळी अणवस्त्र संघर्षाच्या दिशेने परिस्थिती चाललेली. त्यांच्या मध्यस्थीमुळे 35 मिलियन लोकांचे प्राण वाचले” असा दावा ट्रम्प यांनी केला.

    मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला होता. त्यांनी तिथे फिरायला आलेल्या हिंदू पर्यटकांची पत्नी आणि मुलांसमोर गोळ्या मारुन हत्या केली होती. भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करुन या दहशतवादी कृत्याचा बदला घेतला. त्यानंतर 7 ते 10 मे दरम्यान दोन्ही देशांमध्ये चार दिवस सैन्य संघर्ष झाला. भारताने पाकिस्तानला चांगलचं धुतलं.

    “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पीएम शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरुन संवाद साधून दोन्ही देशांमध्ये तणाव कमी केला” असा डोनाल्ड ट्रम्प यांनी मे 2025 पासून अनेकदा दावा केला आहे. ते भारत-पाकिस्तान सीजफायरच श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तान त्यांना ते श्रेय देतो. पण भारताने कधीही ट्रम्प यांचा दावा मान्य केलेला नाही. आम्ही ट्रम्प यांच्यामुळे सीजफायरचा निर्णय घेतला नाही, हे भारताने आतापर्यंत अनेकदा ठणकावून सांगितलं आहे.

    उलट पाकिस्ताननेच घातलेलं लोटांगण

    ऑपरेशन सिंदूरच्यावेळी उलट पाकिस्ताननेच अमेरिकेसमोर लोटांगण घातलं होतं. पहिल्यांदा अमेरिकेने हे मान्य केलय की, भारताच्या कारवाईला घाबरुन पाकिस्तानने अमेरिकेकडे मदत मागितली होती. भारताने ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानच्या अनेक सैन्य तळांना लक्ष्य केलं होतं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed