काँग्रेसचे शैलेश पांडे नागपूर महापालिकेच्या विशेष सभेच्या निमित्ताने थेट स्वच्छता कर्मचाऱ्याचा वेश परिधान करुन महापालिकेत आले. त्यांच्या हातात झाडू देखील होता. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कमी संख्येच्या मुद्द्यावरुन त्यांनी महापालिकेच्या आवारात झाडू मारत निषेध व्यक्त केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : प्रभागात स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने नियमितपणे स्वच्छता होत नाही. ठिकठिकाणी कचरा पडून असल्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे प्रभाग ११ चे नगरसेवक शैलेश पांडे हे मंगळवारी झालेल्या नागपूर महापालिकेच्या विशेष सभेत स्वच्छता कर्मचाऱ्याच्या वेश परिधान करून आले होते. यावेळी पांडे यांनी हाती झाडू घेत सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिकेचे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत प्रवेश करू दिला नाही. पांडे यांच्या या कृतीने शहरातील स्वच्छतेच्या संबंधीच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हाती झाडू घेतलेल्या पांडे यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांनी सभागृहाच्या बाहेरच उभे राहत या प्रकाराचा निषेध नोंदवला. यावेळी सभा संपेपर्यंत त्यांनी सभागृहाचा परिसर झाडून काढला.
प्रभाग ११ मध्ये स्वच्छतेची कामे नियमितपणे होतील, स्वच्छता कर्मचारी नियमितपणे कचऱ्याची उचल करतील, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल, सांडपाणी व्यवस्थापन यासंबंधीच्या समस्या सुटतील या अपेक्षेने नागरिकांनी निवडून दिले आहे. दरम्यान यासंबंधी महापौर निता ठाकरे आणि आयुक्त अभिजीत चौधरी यांनाही निवेदन दिले. मात्र, त्यानंतरही यावर कोणताच तोडगा निघाला नसल्याचा आरोप पांडे यांनी यावेळी केला.
शहरातील ढासळत्या स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबद्दल विशेष सभेचे आयोजन व्हावे अशी मागणी केली होती. मात्र, महापालिका प्रशासनाकडून याबद्दल कुठलेही आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे संतापलेल्या पांडे यांनी जोपर्यंत स्वच्छता या विषयावर महापौर किवा महापालिका आयुक्तांकडून ठोस उपाययोजनांचे आश्वासन मिळत नाही, तोवर प्रत्येक सभेला याच वेशभूषेत हजेरी लावणार, असेही संतप्त पांडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंगळवारी झोनमधील प्रभाग ११ मध्ये ७५ हजारांची लोकसंख्या आहे. त्यामुळे याठिकाणी किमान ३०० स्वच्छता कर्मचारी हवेत. मात्र, झोन कार्यालयाच्या वतीने नुकतेच केवळ १०० कर्मचारी दिले. यातील ६० कर्मचारी केवळ नेहमी कर्तव्यावर दिसून येतात. अनेक कर्मचारी ज्येष्ठ आहेत किवा आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त आहेत. त्यामुळे कामांवर तीव्र परिणाम झाला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा