• Sat. Sep 19th, 2026

संविधान वाचवण्यासाठी आम्ही राजकारणात- खासदार प्रणिती शिंदे 

ByMH LIVE NEWS

Feb 23, 2026
संविधान वाचवण्यासाठी आम्ही राजकारणात- खासदार प्रणिती शिंदे 

नवी दिल्ली

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकताच मोठे विधान केले. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठे अपयश मिळाले. सोलापूरच्या महापालिका निवडणुका प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आल्या. मात्र, तिथेही मोठे अपयश काँग्रेसला मिळाले. सोलापूर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, आता महापालिकेची एकहाती सत्ता भाजपाच्या हाती आहे. प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात भाजपावर अनेक गंभीर आरोप केली. संविधान वाचवण्याचा निर्णय घेऊन आम्ही राजकारणात आलोय असे नुकताच मोठे विधान प्रणिती शिंदे यांनी केले. संविधान वाचवण्याचा निर्णय घेऊनच आम्ही राजकारणात आल्याचे प्रणिती शिंदे यांनी म्हटले. कोणतेही काम असो आम्ही सदैव जनसेवेसाठी तत्पर असतो आणि आम्ही लोकशाही पद्धतीनेच कारभार करतो, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले.

पुढे बोलताना प्रणिती शिंदे यांनी म्हटले की, आम्ही लोकशाही पद्धतीनेच कारभार करतो, संविधान वाचवण्यासाठीच आम्ही राजकारणात आहोत. प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. गेल्या वर्षभरात निवडणुका आणि आचारसंहितेतच वेळ गेला. मात्र, आता विकासकामांची उणीव भरून काढणे आणि प्रत्यक्ष कामाला गती देणे हेच आमचे तत्त्व, प्रथा आणि परंपरा आहे.

संविधान वाचवण्याचा निर्णय घेऊन आम्ही राजकारणात आलो. आज फार कमी लोक आहेत. जे सविधान वाचवण्याचं काम करत आहेत. खासदार निधीतील कामाच्या शुभारंभावेळी त्या बोलत होत्या. खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून सोलापूर शहरातील अरविंद धाम येथे 10 लाखांचा काँक्रिट रस्ता करण्यात आलाय. या शुभारंभाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

महापालिका निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केली होती. महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. महापालिका निवडणुकीवेळी सातत्याने आरोप केली गेली की, प्रणिती शिंदे या भाजपासाठी काम करत आहेत. मात्र, या आरोपांवर बोलणे प्रणिती शिंदे यांनी टाळले. आता सत्ताधाऱ्यांवर थेट टीका करताना प्रणिती शिंदे दिसल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *