नाशिक-मुंबई महामार्गालगत वाडीवरे शिवारात तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतदेहाजवळ पिझ्झाचे बॉक्स आढळल्याने तपासाला नवे वळण मिळाले असून…
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-मुंबई महामार्गापासून जवळच असलेल्या एका निर्जन भागात आज सकाळी स्थानिकांना एक मृतदेह दिसून आला. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती वाडीवरे पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, साधारण २५ वर्ष वयोगटातील एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली होती. प्रथमदर्शनी या तरुणीवर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
तपासाचा धागादोरा काय?
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, मयत तरुणीच्या मृतदेहाजवळ पिझ्झाचे बॉक्स आणि काही खाद्यपदार्थ आढळून आले आहेत. ही तरुणी कोणासोबत तरी येथे आली होती का? किंवा तिने जेवण मागवले होते का? या दिशेने आता पोलीस तपास करत आहेत. या तरुणीच्या अंगावर काळ्या रंगाचे कपडे असून, मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. ही हत्या येथेच करण्यात आली की अन्यत्र हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह येथे आणून टाकला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
Beed Crime: ‘आता तुला सोडत नाही’; वृद्धाला चौकात मारहाण केली, व्हिडिओ काढला, सगल दोन दिवस जीवावरच उठला; एवढी दहशत…
पोलिस अधीक्षकांचे आवाहन
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की, “या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वाडीवरे पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली आहेत. तांत्रिक पुरावे आणि घटनास्थळावरील वस्तूंवरून आरोपींचा शोध सुरू आहे.” तसेच, सदर वर्णनाची कोणतीही तरुणी बेपत्ता असल्यास नागरिकांनी तातडीने वाडीवरे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
Crime News : ‘कॉपी’ पकडली म्हणून गुरूवर संतापला, डॉक्टर विद्यार्थ्याचा राडा; वर्गातच प्राध्यापकावर बुक्क्यांचा वर्षाव, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
सध्या वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. या थरारक हत्याकांडाने संपूर्ण नाशिक जिल्हा सुन्न झाला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.
