• Sat. Mar 7th, 2026

    Gautami Patil : ‘अजित दादांनी नकळत का होईना मला सपोर्ट केला’, गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली?

    Gautami Patil : ‘अजित दादांनी नकळत का होईना मला सपोर्ट केला’, गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली?

    डान्सर गौतमी पाटील हिने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांनी नकळत का होईना पण आपल्याला सपोर्ट केल्याचं गौतमी पाटील म्हणाली. अजित दादांची आपली कधी भेट होऊ शकली नसल्याची खंत गौतमी पाटीलने व्यक्त केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली. “मी अजित दादांच्या बाबतीत एक सांगते, न कळत का होईना पण दादांनी मला सपोर्ट केला. मी दादांसोबत कधी बोलले नाही. आमची भेट झाली नाही. काही नाही. पण अजित दादांनी मला सपोर्ट केला. दादांचे ते दोन शब्द प्रेमाचे माझ्यासोबत बोलणं असूदे, ते आता मध्ये त्यांना कुणी विचारलं की, बैलांसमोर नाचली, मग त्यावर ते म्हणाले, तुला काय करायचं? हा माझ्यासाठी सपोर्टच झाला. लोकांनी मला बऱ्याचदा ट्रोल केलं. पण दादांनी त्यावर उत्तर दिलं. दादांनी प्रत्येक कलाकाराला सपोर्ट दिलाय. प्रत्येक कलाकारासाला दादांनी जीव लावला आहे. पण दादांना कधी भेटायची वेळ आली नाही या गोष्टीची खूप खंत आहे”, असं गौतमी पाटील म्हणाली.

    अजित दादा यांच्या विमान अपघाताची बातमी आली तेव्हा तू कुठे होतीस? असा प्रश्न गौतमीला विचारला गेला. त्यावर तिने प्रतिक्रिया दिली. “त्यावेळेस मी घरीच होते. मी नुकतंच उठलेली. मीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी शॉकिंग न्यूज होती. मी उठले तेव्हा मला माझ्या आईने या घटनेची माहिती दिली. मी म्हणाले, अगं वेडी आहेस का, दुसरं काहीतरी असेल नाहीतर फेक असेल. आता या क्षणाला देखील खरं वाटत नाही की, असं काही झालं आहे. एकदम शॉकिंग होतं हे सगळं. माझी तर झोपच गेली. अजित दादांनी महाराष्ट्रासाठी जे प्रामाणिकपणे काम केलं आहे, मला नाही वाटत की, दादांसारखा नेता परत होईल. अजित दादांची जागा कुणी घेईल हे शक्यच नाही”, असंदेखील गौतमी पाटील म्हणाली.

    गौतमीचा तरुणीना मोलाचा सल्ला

    “माझ्याकडे लहान-लहान मुली येतात आणि ताई मला तुझ्याकडून डान्स शिकायचा आहे, असं म्हणतात. एक मुलगी तिच्या वडिलांना घेऊन आली आणि म्हणाली की मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी तिला बोलावून व्हॅनिटीत घेतलं. तिला विचारलं की, बोल तुला काय बोलायचं आहे. ती म्हणाली, मला तुझ्यासोबत शो करायचे आहेत. लहान मुलगी होती. मी तिला म्हटलं, शो करायचे आहेत? तुला कुणी सांगितलं शो करायचे? छान डान्स क्लास लाव. प्रोफेशनल डान्स क्लास असतात. डान्स क्लासमध्ये शिक, त्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून इव्हेंट मिळतात ते कर. पण या क्षेत्रात नको. मी स्वत: मुलींना म्हणते की, जे माझ्यासारखं काम करायचा विचार करता त्यांना मी म्हणेन की, तुम्ही छान डान्सक्लास लावा. तिथे शिका. मी यातून आधीपासून आले. मी टप्प्याटप्प्याने शिकत आली. ते मी कशी आली ते माझं मला माहिती. म्हणून तुम्ही या क्षेत्रात पडायला नको”, असं मत गौतमी पाटील हिने मांडलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा