baby girl dies mother donates body parts : अवघ्या ५४ दिवसांच्या कोवळ्या जिवाची प्राणज्योत मालवली आणि घोरपडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
घोरपडे कुटुंबात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झाल्याने आनंदाला पारावार उरला नव्हता. मात्र, जन्मताच या चिमुकलीला मेंदूवर सूज (मेंदूज्वर) असल्याच्या आजाराने ग्रासले. आई-वडिलांनी आपल्या लेकीला वाचवण्यासाठी रात्रंदिवस एक केला, घाटीत उपचार सुरू झाले, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अवघ्या ५४ दिवसांच्या या कोवळ्या जिवाची प्राणज्योत मालवली आणि घोरपडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
ती ४५ मिनिटे… अन् सुन्न झालेलं जग!
देहदानाचा निर्णय झाला, अवघ्या काही मिनिटांत कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली, पण एक आई आपल्या काळजाच्या तुकड्याला स्वतःपासून विलग कसं करणार? देहदानाची प्रक्रिया संपल्यावरही आई-वडील तिथेच स्तब्ध बसून राहिले. पूर्ण ४५ मिनिटे ती माऊली आपल्या निष्प्राण लेकीच्या चेहऱ्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी एकटक पाहत होती. आई पूर्णपणे सुन्न झाली होती, तर वडिलांचा कंठ दाटून आला होता. तिथून हलण्याची त्यांची मानसिक स्थिती नव्हती, हे दृश्य पाहून घाटीतील अनुभवी डॉक्टरांचेही डोळे पाणावले.
Cab Driver Obscene Message : भावा, शरीरसंबंध ठेवणार का? कॅब बूक करुन ग्राहकाचा चालकाला अश्लील मेसेज, नकार देताच चक्रावणारा प्रकार
या चिमुकलीचा देह आता घाटी रुग्णालयातील शरीररचनाशास्त्र विभागात वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी वापरला जाणार आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी या कुटुंबाचे कौतुक करताना म्हटले की, “लहान मूल हे हृदयाच्या सर्वात जवळ असते, अशा वेळी देहदानाचा हा धाडसी निर्णय घेणे अत्यंत आव्हानात्मक आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे”. शरीररचनाशास्त्र विभागाच्या डॉ. स्वप्ना आंबेकर यांनी नातेवाईकांशी संवाद साधत ही प्रक्रिया पूर्ण केली.
Nashik News : मित्राची अनामिक ओढ, आईची नजर चुकवून नाशकातील तीन अल्पवयीन मैत्रिणी भेटीला, रात्री घराजवळ पेरुच्या बागेतच…
मरणोत्तरही ‘ती’ जिवंत राहिली!
आपल्या पोटच्या गोळ्याच्या मृत्यूचं दुःख डोंगराएवढं असताना, तिचा देह कोणाचं तरी भविष्य घडवण्यासाठी कामी यावा, हा घोरपडे कुटुंबाचा विचार थक्क करणारा आहे. ही चिमुकली आज या जगात नसली, तरी वैद्यकीय ज्ञानाच्या रूपाने ती अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पेरून गेली आहे.
Eknath Shinde | ड्रग्स फ्री आणि प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी प्रयत्न करणार, शिंदेंची घोषणा
