• Sat. Mar 7th, 2026
    Crime News: आई, मी घर सोडतेय, लोकांना…; ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दोन दिवस आधी बिल्डरची मुलगी गायब, पोलिसांना ‘तो’ संशय!

    Valentine Day: तरुणीने आपल्या आईच्या मोबाईलवर ती घर सोडून जात असल्याचा मेसेज केला आणि त्यानंतर या तरुणीचा फोन तातडीने ‘स्विच ऑफ’ झाला. त्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

    ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दोन दिवस आधी बिल्डरची मुलगी गायब(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: ‘ व्हॅलेंटाईन डे ‘ जवळ आलेला असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. “मम्मी, मी घर सोडून कायमची चाललेय, लोकांना सांगून दे…”, असा मेसेज आईला पाठवून एका तरुण मुलीने घराचा उंबरठा ओलांडला. प्रेमाच्या या आठवड्यात मुलीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

    याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, ही मुलगी फुलंब्री शहरातील एका प्रतिष्ठित आणि सधन कुटुंबातील आहे. तिचे वडील व्यवसायाने बिल्डर असून कुटुंबात सुबत्ता आहे. घरात कोणत्याही गोष्टीची उणीव नसताना आणि अत्यंत लाडात वाढलेल्या या मुलीने अचानक असं पाऊल का उचललं, याचं गूढ कायम आहे. नेहमीप्रमाणे घरात सर्व काही सुरळीत असताना अचानक आलेल्या या मेसेजमुळे एका सुखी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    व्हॅलेंटाईन डे आणि ‘तो’ रहस्यमय मेसेज!
    14 फेब्रुवारीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना, या मुलीने अचानक घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या आईच्या मोबाईलवर आपण घर सोडून जात असल्याचे कळवले आणि त्यानंतर तिचा फोन तातडीने ‘स्विच ऑफ’ झाला. आई-वडिलांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हताश होऊन पोलिसांत धाव घेतली.

    प्रेमप्रकरणाचा संशय? पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे

    व्हॅलेंटाईन वीक सुरू असल्याने ही मुलगी एखाद्या प्रेमप्रकरणातून किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून घर सोडून गेली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. बिल्डर पित्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असून मुलीच्या सोशल मीडिया चॅट्सची आणि कॉल डिटेल्सची बारकाईने तपासणी केली जात आहे. पोलीस शहरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तिचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा