• Fri. Mar 13th, 2026
    Amravati Crime : ‘तुझी मुलांसोबत लफडी’; अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यात अडवलं, धमकावून सामूहिक अत्याचार; डॉक्टरकडे गेल्यावर…

    Amravati Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

    अमरावती १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यात संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला बदनामीची धमकी देत पाच नराधमांनी तब्बल सात महिन्यांच्या कालावधीत वारंवार सामूहिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. या अमानुष कृत्यामुळे पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी 9 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पाचही आरोपींविरुद्ध पॉक्सो कायदा तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    नेमकी घटना काय?

    प्राथमिक तपासानुसार, पीडित मुलगी शाळेतून घरी जात असताना साईनाथ (वय 18) आणि अजिंक्य (वय 18) यांनी तिला अडवून ‘तुझे मुलांसोबत लफडे आहेत, आम्ही तुझी बदनामी करू,’ अशी धमकी दिली. त्यानंतर नराधमांनी भीतीने घाबरलेल्या मुलीला त्यांनी विरूळ रोंघे मार्गावरील निर्जन ठिकाणी नेऊन पहिला अत्याचार केला. त्यानंतर कार्तिक गजानन शेलोकार, साहील (वय 18) आणि संकेत विनोद काळे (वय 2) यांनीही वेगवेगळ्या वेळी तिच्यावर अत्याचार केला.
    Maharashtra TimesMumbai Crime : बॉयफ्रेंडची दुसऱ्या तरुणीसोबत जवळीक, गर्लफ्रेंडचा जळफळाट, 19 वर्षीय तरुणीला संपवलं; मुंबई हादरली

    प्रकृती बिघडल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर

    हा अत्याचार 7 जुलै 2025 ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सुरू होता. आरोपींनी सतत धमकावल्यामुळे पीडिता तक्रार करण्यास घाबरत होती. अखेर प्रकृती बिघडल्यानंतर वैद्यकीय तपासणीत ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं, त्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी तत्परता दाखवत 9 फेब्रुवारी रोजी रात्री 10:51 वाजता कार्तिक गजानन शेलोकार (वय 21) आणि संकेत विनोद काळे (वय 22) या दोघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपी साईनाथ, अजिंक्य आणि साहील असून पोलीस त्यांचा कसून शोध घेतला असून, ते तीन आरोपी सुद्धा अटकेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक वीणा पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपींवर बलात्कार, सामूहिक अत्याचार, पॉक्सो व अॅट्रॉसिटी अंतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस जलदगतीने पुरावे गोळा करत आहेत.
    Maharashtra TimesMumbai Local: मुंबई लोकलमधून तरुण थेट पाण्यात पडला, मध्यरात्री सुटकेचा थरार; VIDEO आला समोर

    19 वर्षीय तरुणीला संपवलं

    गोवंडी परिसरात 19 वर्षांच्या शिफा शेख हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या या भीषण घटनेत शिफाला गोळी झाडून ठार केले गेले असून, पोलिसांनी तात्काळ चौघा आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत टाकलं आहे. या प्रकरणी आरोपींमध्ये साजिद शेख, कलाम चौधरी, रिझवान शेख उर्फ नदीम आणि तबस्समूम शेख यांचा समावेश आहे. स्थानिक न्यायालयाने चारही आरोपींना 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा