Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील संघर्ष समोर आला आहे
भाजपने शिवसेनेला उपमहापौरपद देत पालिकेच्या सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जंजाळ यांना उमेदवारी दिली. शिरसाट यांचा मात्र जंजाळ यांच्या उमेदवारीला विरोध होता; परंतु मुख्य नेत्याच्या निर्णयापुढे त्यांचे काहीच चालले नाही.
काय म्हणाले राजेंद्र जंजाळ?
उपमहापौरपदाची निवडणूक झाल्यावर जंजाळ समर्थकांनी जल्लोष केला. शिरसाट यांना डिवचणारे फलक समर्थकांच्या हातात होते. याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मागितली होती. तेव्हा तू लहान आहेस, असे सांगून बोळवण करण्यात आली. विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी मागितली तेव्हाही डावलले.’
Soham Katre : डोंबिवलीच्या सोहमचा लोकलमधून पडून बळी, वडील ZP मतदानासाठी गावी, आई-भावापासून संध्याकाळपर्यंत लपवलेलं; आता दादाची हात जोडून मागणी
‘उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सर्व निकषात बसत असतानाही पालकमंत्र्यांनी मला उमेदवारी देण्यास नकार दिला. त्यांना त्यांच्या मुलीला हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करायचे होते. पालकमंत्री सातत्याने मला डावलत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल राग होता. तो राग त्यांनी जल्लोषातून व्यक्त केला. जल्लोष करणाऱ्यांमध्ये पंधरापेक्षा जास्त पराभूत उमेदवार होते.’ असंही राजेंद्र जंजाळ म्हणाले.
Mumbai Crime : जुहू बीचवरील बॉडीचं गूढ CCTV मुळे उकललं; मित्राच्या बायकोशी लफडं, 30 वर्षीय तरुणासोबत काय घडलं?
नाशिकच्या उपमहापौरपदासाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला
दुसरीकडे, शिवसेना हा विकासाचा पक्ष असून, नागरिकांच्या कामासाठी सर्वांनी एकजूट होऊन कार्य करावे. यापुढे गटा-तटाचे राजकारण कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये गटबाजी करणाऱ्यांना दिला. तसेच कल्याण-डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या धर्तीवर उपमहापौरपद सव्वा वर्ष, तर गटनेतेपद एक वर्षासाठी दिले जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे संपर्क नेते राम रेपाळे यांनी दिली. परंतु, यासंदर्भातील अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे हेच घेतील असे सांगत, रेपाळे यांनी पदवाटपाबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला आहे.
Sanjay Shirsat | छ. संभाजीनगरमध्ये भाजपची आघाडी, शिवसेना बॅकफूटवर, शिरसाटांची प्रतिक्रिया
