Nanded News : नांदेड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलाच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर वडिलांनी देखील प्राण सोडले आहेत. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लेकाचं अल्पशा आजाराने निधन
गणेश ताडेवाड हे हिमायतनगर तालुक्यातील सिदबरा येथील रहिवासी आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते हिमायतनगर शहरात आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होते. गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. तर त्यांचे वडील रामलू हे तालुक्यातील सिदबरा गावात राहत होते. सोमवारी दुपारी गणेश ताटेवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले. मुलाच्या निधनाची बातमी वडिलांना देण्यात आली. काल मंगळवारी दुपारी हिमायतनगर शहरात स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्याचे ठरलं.
Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी 6000 कोटी, येत्या जूनपर्यंत भूसंपादन होणार पूर्ण; पुण्यातील कोणत्या गावांमध्ये उभारणार विमानतळ?काल मंगळवारी सकाळी त्यांचा नातू आजोबांना घेण्यासाठी सिदबरा गावी गेला. मात्र, पोटचा मुलगा गेल्याचं दुःख बापाला सहन झालं नाही, आणि मुलाला शेवटचं पाहण्यापूर्वीच वडील रामलू यांनी आपले प्राण सोडले. मुलाच्या अंत्यविधीची तयारी सुरु असतानाच बापाच्या निधनाची वार्ता आली. या दुहेरी संकटामुळे नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केलं. दरम्यान, मुलगा गणेश ताडेवाड यांच्यावर हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर लगेच त्यांचे वडील रामलू यांच्यावर दुपारी 12 वाजताच्या सुमारास सिदबरा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी बाप लेकावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. गणेश ताडेवाड यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या दुहेरी संकटामुळे ताडेवाड कुटुंबियावर दुःखाचं सावट पसरलं आहे.
Nashik Crime : साईंच्या शिर्डीत लग्नगाठ बांधली, काही दिवसांनी अमानुष छळ; नाशिकमध्ये विवाहितेचा संशायस्पद मृत्यू
हल्यावर चढण्यापूर्वीच पोलीस नवरदेव अचानक बेपत्ता
नवरदेव वरात घेऊन वधूच्या घरी पोहचला. अंगाला हळद लागली. दुसऱ्या दिवशी दुपारी विवाह पार पडणार होता. त्यापूर्वी हळदीच्या कार्यक्रमात नवरदेवाने नवरी सोबत डीजेवर मनसोक्त डान्स देखील केला, पण लग्नाच्या काही तासांपूर्वीच भलतचं घडलं. बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव बेपत्ता झाला. वधूने पाहिलेलं संसाराचं स्वप्न हे स्वप्नच राहून गेलं. एका चित्रपटातील कथेप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात ही घटना घडली आहे.
