• Fri. Jul 3rd, 2026

    अन्न व औषध प्रशासन विभागासाठी मंजूर निधीतील कामे तातडीने पूर्ण करा – मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 10, 2026
    अन्न व औषध प्रशासन विभागासाठी मंजूर निधीतील कामे तातडीने पूर्ण करा – मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

    मुंबई, दि. १०: अन्न औषध प्रशासन विभागाच्या सक्षमीकरणासाठी नियोजित कामे तातडीने पूर्ण करावीत. यासाठी मंजूर केलेला निधी कालमर्यादेत खर्च होईल, यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

    मंत्रालयात मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे प्रधान सचिव धीरज कुमार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर दुबे पाटील, विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, सहआयुक्त मंगेश माने यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री झिरवाळ म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागातील बळकटीकरणासाठी व विकासासाठी शासनाने ७२ कोटी रुपयांची तरतूद करून दिली आहे. त्यातील कामे काल मर्यादेत पूर्ण होण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात. विभागाच्या अंतर्गत प्रयोगशाळांचे सक्षमीकरण, बांधकामे आदी विकास कामांना गती दिली जावी.

    यावेळी राज्यातील अन्न नमुने तपासणी प्रयोगशाळांच्या सद्यस्थिती वर चर्चा करण्यात आली. अन्न भेसळ रोखण्यासाठी या प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यासाठी कार्यवाही केली जाईल. तसेच शासकीय प्रयोगशाळा व्यतिरिक्त मान्यता दिलेल्या खासगी प्रयोगशाळांच्या बाबत माहिती देण्यात आली.

    ०००

    किरण वाघ/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed