माजी आमदार दिलीप मानेंच्या लेकानं बाजी मारली;सहा हजारच्या लीडनं जिप सदस्य, काँग्रेसच्या मातब्बर नेत्याला केलं पराभूत
माने कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय
दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या दोन तालुक्यात मानें कुटुंबीयांची मोठी राजकीय ताकद आहे.मागील एक दशकापासून माने कुटुंबीयाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी दिलीप मानेंचा महाविकास आघाडीने पत्ता कट केला होता.काही दिवसांपूर्वी दिलीप मानें यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता.सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत दिलीप माने यांनी शांत भूमिका घेतली होती.,जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र मुलगा पृथ्वीराजला मैदानात उतरविले होते.दिलीप माने हे देखील आमदार म्हणून लोकप्रतिनिधित्व केले आहे.दिलीप मानें यांचे वडील ब्रह्मदेव दादा मानें हे देखील आमदार होते.माने कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.
काँग्रेसच्या तालुका अध्यक्षकांला पराभूत केले आहे
पृथ्वीराज दिलीप माने यांच्या समोर कोंडी जिल्हा परिषद गटात काँग्रेस तालुका अध्यक्ष भारत जाधव यांच तगड आवाहन होतं.पृथ्वीराज माने यांच्या प्रचारासाठी स्वतः दिलीप मानें निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.अनेक ठिकाणी सभा ,मतदारांच्या गाठीभेटी घेत दिलीप माने यांनी आपली यंत्रणा कामाला लावली होती.अखेर निकाल लागला असून 6 हजार मतांच्या लीडने पृथ्वीराज दिलीप माने यांचा विजय झाला आहे.
