परभणी जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा! ५४ पैकी २४ जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) १५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर.
परभणी जिल्हा परिषदेमध्ये मागील दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्ता होती. मागील बऱ्याच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने सर्वत्र प्रशासक राज आले होते. पण आता झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी प्रचंड जोर लावला होता. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील जिल्हा परिषदेसाठी कंबर कसली होती. परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावं तेवढं यश न मिळाल्याने हे महायुतीतील दोन्ही पक्ष जिल्हा परिषद ताब्यात ताब्यात घेण्यासाठी सरसावले होते पण अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड दुःखाचे सावट होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीच्या काळात कसल्याही प्रकारचा प्रचार केला नाही तर दुसरीकडे भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी आपल्या सभा रद्द केल्या असल्या तरीही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र प्रचाराचा किल्ला लढवला.
आज जिल्हा परिषदेचा निकाल हाती आला असून तब्बल 54 पकी 24 जागा जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यापाठोपाठ 15 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरे स्थान पटकावले आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना हे संख्याबळ जास्त होतं पण तरी देखील अजित पवार गटाने 15 जागा जिंकले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील सहा जागा जिंकले आहेत तर शिवसेना शिंदे गट पाच जागांवर विजयी झाला आहे जिल्ह्यामध्ये काँग्रेसची वाहतात थांबता थांबत नाही केवळ तीन जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष निवडणूक लढत निवडून आले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या ढगे यांना शेतकऱ्यांनी त्यांना न्याय दिला आहे.
भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी माजी मंत्री वरपूडकर यांना मात्र धक्का
परभणीच्या जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 24 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे भारतीय जनता पक्षाला हे यश मोठे मिळाले असले तरी मात्र माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी आपल्याच घरातील पाच जणांना दिलेल्या उमेदवारी मध्ये तब्बल चार जणांचा पराभव झाल्याने सुरेश वरपूडकर यांना मात्र प्रचंड धक्का बसला आहे. सुरेश वरपूडकर यांचा मुलगा समशेर वरपूडकर आणि सून प्रेरणा वरपूडकर आणि पुतण्या ऐश्वर्या वरपूडकर या तिघांनीही भाजपकडून निवडणूक लढली होती आणि तिघांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
महायुतीच्या तीनही आमदारांनी आपल्या मतदारसंघात बजावली चांगली कामगिरी
परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीचे तीन आमदार आहेत पालकमंत्री मेघना बोर्डीकर या जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्यांच्या नेतृत्वात या मतदारसंघात तब्बल 15 पैकी 11 जागा जिंकत आपला परफॉर्मन् दाखवला आहे तर पाथरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी त्यांच्या तीनही तालुक्यामध्ये आठ जागा जिंकत त्यांनी देखील आपली बाजू भक्कम केली आहे. त्याचबरोबर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपले सर्वच्या सर्व उमेदवार भाजपच्या कमळाच्या चिन्हावर उभे केले आणि याचा त्यांना चांगलाच फायदा झालेला दिसून येत आहे. तब्बल 11 जागा जिंकत आमदार रत्नाकर गुट्टे यांनी महायुतीमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची झाली वाताहत
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मात्र सपशेल अपयशी ठरली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ सहा जागा जिंकाविण्यात आले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये एक आमदार एक खासदार असताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपला वर्चस्व या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दाखविता आला नाही. खासदार संजय जाधव यांनी जिल्हाभरामध्ये प्रचाराची धुरा हातात घेतली पण त्यांना केवळ सहा जागा निवडून आणता आल्या. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाला तर केवळ तीन जागांवर समधान मानावे लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे चांगले प्रापडले होते पण आता काँग्रेस पक्षाची वाहत आहात होताना दिसत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नाही त्यामुळे महाविकास आघाडीला केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
