भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १५२ भारताची एकता, अखंडता व सौर्वभौमत्व धोक्यात आणणारी कृत्ये सह १९६, १९७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी कलाने यांनी केली आहे. भाजपचे महामंत्री महेश काळेश्वरकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी सादर केलेले गीत हे त्यांचे देशभक्तीपर आहे. भारत-पाकिस्तान १९६५ च्या युद्धात सैनिक आणि नागरिकांना युद्धात प्रवृत्त करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पाकिस्तानमध्ये गायले जात होते.आजही पाकिस्तानमध्ये लष्करी व राष्ट्रीय समारंभात हे गीत गायले जाते. असे देशविरोधी गीत एका शासकीय शाळेत विद्यार्थ्यांकडून गाऊन घेणे व त्यावर नृत्य करण्यास लावणे गंभीर आहे. विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर देशविरोधी विचार रुजविण्याचा धोका आहे, असेही काळेश्वरकर यांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांनी पोलिसांकडून गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करीत राहू, असा इशारा दिला आहे.‘नगर परिषदेच्या शाळेत झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर नृत्यावरून तक्रार दाखल झाली आहे. चौकशी सुरू आहे’, अशी माहिती ठाणेदार शंकर पांचाळ यांनी दिली आहे.
शिक्षण सभापतींनी फेटाळले आरोप
३१ जानेवारीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले गीत १८५७च्या स्वातंत्रलढ्यावर आधारित होते. या गीतामधून देशासाठी योगदान देण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला गेला. यात कोणत्याही धर्माचा प्रचार किंवा राष्ट्रीय अखंडतेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला नाही, असे शिक्षण सभापती रसूल पटेल यांनी म्हटले आहे.