• Wed. Jul 1st, 2026

    छत्रपती संभाजीनगरात भाजपचे समीर राजुरकर महापौर, पण उपमहापौरपदाचा पेच कायम, शिंदे सेनेचे दोन नेते इच्छुक

    ByMH LIVE NEWS

    Feb 6, 2026
    छत्रपती संभाजीनगरात भाजपचे समीर राजुरकर महापौर, पण उपमहापौरपदाचा पेच कायम, शिंदे सेनेचे दोन नेते इच्छुक

     छत्रपती संभाजीनगर

     छत्रपती संभाजीनगरच्या नव्या महापौर पदी समीर राजूरकर यांची निवड झाली आहे. छत्रपती संभाजीनगरचा गड भाजप न राखलेला आहे. शिवसेना विरुद्ध भाजप अशी अटीतटीची लढत संभाजीनगर मध्ये झाली होती. तर समीर राजूरकर हे छत्रपती संभाजीनगर मनपाचे महापौर असतील. ज्या शहराने गेल्या काही दशकांत अनेक राजकीय वादळं पाहिली, त्याच शहराच्या महापौरपदाच्या खुर्चीवर आता भारतीय जनता पक्षाचे समीर सुभाष राजूरकर यांची छत्रपती संभाजीनगरचे नवे महापौर म्हणून झालेली निवड सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

    उपमहापौर कोण?

    छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदे शिवसेना भाजप दोन्ही वेगवेगळे लढल्यामुळे याठिकाणी शिंदे शिवसेना देखील आता चर्चा करून उपमहापौर देण्याची तयारी करत आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांच नाव देखील पुढे करण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांना फॉर्म भरण्याच देखील सांगितलं आहे. पण उपमहापौरपदाबातची निश्चितता अजून तळ्यात मळ्यात आहे. कारण उपमहापौरपदासाठी माजी महापौर त्र्यंबक तुपेही तयारी करत असल्याची माहिती आहे. त्यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळते आहे.दरम्यान, राजकारणात वारसाहक्काने पदं मिळवणाऱ्यांच्या गर्दीत समीर राजूरकर हे नाव अपवाद ठरलं आहे. १९९५ मध्ये एका छोट्या वॉर्डाचे अध्यक्ष म्हणून सुरू झालेला हा प्रवास आज महापालिकेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते शहराचा प्रथम नागरिक असा प्रवास त्यांनी केला आहे. भाजपच्या संघटनात्मक बांधणीत त्यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याचेच फळ आज त्यांना मिळाले आहे.

    लोकसभा ते विधानसभा; आता स्वतः महापौर

    २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने जे यश मिळवलं, त्यामागे समीर राजूरकरांचे निवडणूक नियोजन अत्यंत महत्त्वाचे होते. पक्षाचा ‘चाणक्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूरकरांना आता स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. दोनवेळा नगरसेवक म्हणून काम केल्याने महापालिकेच्या गल्लीबोळातील प्रश्नांची त्यांना खडान् खडा माहिती आहे.

    आव्हानांचा डोंगर

    महापौर म्हणून समीर राजूरकर यांच्या समोर शहराचा वर्षानुवर्षे रखडलेला पाणीप्रश्न, अमृत योजनेची अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर शहराला पुन्हा झळाळी मिळवून देणे, ही मोठी आव्हाने त्यांच्यासमोर असतील.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed