Sanjay Raut reaction on Ajit Pawar: बारामतीत अजित पवारांवर अंत्यसंस्कार; अमित शाह, गडकरींची उपस्थिती. संजय राऊतांची भाजपवर टीका
बुधवारी सकाळी अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला येणार होते. मुंबईतून सकाळी ८.१० वाजता त्यांच्या विमानाने उड्डाण केले. हे विमान ८.४३ वाजता बारामती येथे उतरणार होते. मात्र, दुर्दैवाने धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमान बाजूच्या शेतात कोसळले आणि मोठा स्फोट झाला. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे प्रयत्न केले.
मात्र, अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की, अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, सर्वसामान्यांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
…तर दादा जिवंत असते! ऐनवेळी…; अखेरचे शब्द सांगताना कंठ दाटला, चालकाचे डोळे पाणावले
भाजपवर राऊतांची टीका
अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपच्या वतीने राज्यातील प्रमुख दैनिकांमध्ये श्रद्धांजली वाहणाऱ्या जाहिराती देण्यात आल्या. या जाहिरातींचा धागा पकडत संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘भाजपने कमाल केली! दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार? अजित दादांवर भाजपा म्हणजेच पं.मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 70 हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल’.
संजय राऊत यांच्या या टीकेनंतर आता भाजप काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून, भाजप आणि ठाकरे गटातील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे.
