छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत आता कुणाला संधी मिळणार? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात नुकताच 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरची निवडणूक ही प्रचंड चुरशीची ठरली. या ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट सुरुवातीला एकत्र महायुतीत निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत महायुतीचं जागावाटप ठरलं नाही. अखेर जागावाटपाचं फिक्स झालं नाही आणि शेवटी दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. तर दुसरीकडे ठाकरे गट देखील ताकदीने निवडणुकीत लढला. तसेच एमआयएमने देखील ताकद लावलेली होती. अखेर या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना शिंदे गट तिसऱ्या नंबरवर गेला. या निवडणुकीनंतर आता महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराच्या महापौर, उपमहापौर पदासाठी 10 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नामनिर्देश पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सचिव नंदकिशोर भोंबे यांनी गुरुवारी (२९ फेब्रुवारी) महापौर – उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुकीची प्रक्रिया चार फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. चार आणि पाच फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि सहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात येणार आहे. सहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नामनिर्देश पत्र सचिव कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. ZP Election : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, ZP आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी दहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता विशेष सभा सुरु झाल्यानंतर सभागृहामध्ये पिठासन अधिकारी करणार आहेत. छाननीच्या नंतर अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पिठासन अधिकारी वाचून दाखवतील, त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मनीटांचा अवधी दिला जाणार आहे. दिलेल्या पंधरा मिनीटात पिठासन अधिकारी यांनी लेखी नोटीस देऊन उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक घेण्यात येणार आहे. सुरुवातीला महापौर पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे.
पक्षीय बलाबल
भाजप – ५७ एमआयएम – ३३ शिवसेना – १३ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष – ६ वंचित बहुजन आघाडी – ४ काँग्रेस – १ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – १
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा