Ajit Pawar News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीकडे जाताना विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका भाषणात त्यांनी काळाच्या बोलवण्याबद्दल भाष्य केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोण काम यमचं राहणार आहे? तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. परंतु आपण आपल्या हयातीमध्ये काम करत असताना, राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचं असतं. पण ज्याच्यामधून त्या भागात आर्थिक सुबकता येणार आहे, ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे, असं अजित दादा आपल्या शेवटच्या भाषणात म्हणाले होते. भाजप नेते महेश लांडगे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केलाय.
Ajit Pawar Death : विमान एका बाजूला कललं म्हणून पोरांनी गलका केला, कोणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं… पण क्षणात होत्याचं नव्हतं झालं
अजित दादांचा विमान अपघात २८ जानेवारीला झाला. तर त्याआधी म्हणजेच चार दिवसांआधीचं हे भाषण आहे. जे आहे तोंडावर बोलून मोकळं होणारा दादा नेहमी सर्वांनाच आपलासा वाटला. ज्यावेळी अपघाताची बातमी आली त्यावेळी कोणालाही विश्वास बसत नव्हता. पण नियतीपुढे कोणी मोठं नाही, राजकारणातील दादा एका विमान अपघातामध्ये आपण गमावला.
Ajit Pawar : ‘दादा मला शिव्या देऊ नका…’; भेटायला आलेल्या सरपंचानेच अजित पवारांना पाठवलेली चिट्ठी, लिहिलेलं कारण पाहून दादा पोट धरून हसले
महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला दादांचा फोटो दिसला. विरोधी, सत्ताधारी, जात-धर्म असा कसलाही भेदभाव दिसला नाही, इतक्या खोलवर दादांनी सर्वांच्या मनात आपली जागा बनवली होती. शब्दाचा पक्का असलेला दादा आपल्यात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामधील कधीही भरून न निघणारी पोकळी आहे. महापालिका निवडणुका झाल्यावर आता दादा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तयारीला लागले होते. दादांचा अपघात झाला त्या दिवशी त्यांच्या ४ सभा होणार होत्या. मात्र काळाने दादांना बारामतीत उतरण्याआधीच हिरावलं.
