मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, महापौर पदासाठी अनपेक्षित वळण येण्याची शक्यता आहे. २२ जानेवारीला निघणाऱ्या आरक्षण सोडतीतून ठाकरे सेनेला लॉटरी लागल्यास त्यांचा महापौर होऊ शकतो.
मुंबईत आपला महापौर व्हावा ही इच्छा आहे आणि देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच होईल, असं शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी म्हणाले. मातोश्री बंगल्यावर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. त्या विधानाची बरीच चर्चा झाली. मुंबईत ठाकरेंच्या बाजूनं संख्याबळ नाही. पण तरीही त्यांच्या पक्षाचा महापौर होऊ शकतो.
शिंदेसेना ‘त्या’ मागणीवर ठाम, भाजपला घाम; आता आग्रह अचानक बदलत ‘दीड’ पावलं मागे, कारण काय?
येत्या २२ जानेवारीला महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघेल. याबद्दलची माहिती एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास मंत्रालयानं आजच दिली. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर होणार, या प्रश्नाचं उत्तर २२ जानेवारीला मिळेल. या सोडतीमधून मुंबईचं महापौरपद अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गांसाठी राखीव झाल्यास ठाकरेसेनेला लॉटरी लागेल.
यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५३ आणि प्रभाग क्रमांक १२१ हे दोन प्रभाग अनुसूचित जमातींसाठी राखीव होते. या दोन्ही प्रभागांमध्ये शिवसेना उबाठाचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक ५३ मधून जितेंद्र वळवी निवडून आले आहेत. त्यांनी शिंदेसेनेच्या अशोख खांडवे यांचा पराभव केला. तर प्रभाग क्रमांक १२१ मधून प्रियदर्शनी ठाकरे यांनी विजयाची नोंद केली. शिंदेसेनेच्या उमेदवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव करुन त्या विजयी झाल्या.
भाईंना होमपीचवर नडण्याची तयारी; भाजप थेट आरपारच्या पवित्र्यात; वेळ पडल्यास टोकाचा निर्णय घेणार
मागील वेळी मुंबई महापालिकेचं महापौरपद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव होतं. तेव्हा शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर झाल्या. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. आता एसटी किंवा एसटी महिला प्रवर्गासाठी सोडत निघाल्यास ठाकरेंकडे दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे नशिबाचे फासे फिरल्यास महापौरदपद ठाकरेंच्या पक्षाकडे चालत येऊ शकतं.
