कोल्हापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठ्या घडामोडी सुरु आहेत. महायुतीची आज महत्त्वाची बैठक घडली आहे.
महायुती नेत्यांची बैठक
महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे नियोजन ठरवले. यात मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदिप नरके, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, विनय कोरे, अमल महाडिक उपस्थित होते. जनसुराज्यचे समित कदम, माजी जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनीही या बैठकीत सहभाग घेतला. शक्य तेथे महायुती, अन्यथा मैत्रीपूर्ण लढती करण्याचा निर्णय या बैठकीत झाला असून, जागावाटपासाठी कोअर कमिटी नेमली आहे.
भाजपची 40 जागांची आग्रही मागणी
भाजपने जिल्हा परिषदेच्या 68 सदस्य पदांसाठी 35 ते 40 जागांवर लढण्याची तयारी दर्शवली असून, कोअर कमिटीसमोर 40 जागांची मागणी केली आहे, असे नाथाजी पाटील यांनी सांगितले आहे. बाराही तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जागा वाढवण्याची मागणी देखील केली आहे. यात आमदार शिवाजी पाटील (चंदगड), शौमिका महाडिक (हातकणंगले), माधवराव घाटगे, विजय भोजे (शिरोळ), आबासाहेब पाटील (शाहूवाडी), के. एस. चौगुले, स्वाती पाटील (पन्हाळा), पी. जी. शिंदे (गगनबावडा), शिवाजी बुवा, हंबीरराव पाटील (करवीर), अंबरीष घाटगे, भूषण पाटील (कागल), संभाजी आरडे (राधानगरी), नाथाजी पाटील (भुदरगड) यांचा समावेश आहे. तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी मतदारसंघनिहाय ताकदीप्रमाणे जागा वाटप होईल, असे सांगितले.
Palghar News : समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण, रहस्यमय अन् गूढ वर्तुळ, ज्वालामुखीचा स्फोट होणार? मच्छिमारांमध्ये चिंता
मतदारसंघनिहाय नेतृत्व व तालुका समित्या
कोल्हापूर दक्षिणेत अमल महाडिक, करवीरमध्ये चंद्रदीप नरके, हातकणंगले, इचलकरंजीमध्ये धैर्यशील माने आणि राहुल आवाडे, कागलमध्ये समरजीत सिंह घाटगे, पन्हाळ्यात विनय कोरे, चंदगडमध्ये शिवाजी पाटील हे नेतृत्व करणार आहेत. मंत्री पाटील, मुश्रीफ, आबिटकर, खासदार महाडिक यांचे सर्वांना मार्गदर्शन लाभेल. प्रत्येक तालुक्यात समित्या नेमून इच्छुकांची संख्या आणि जागावाटप अहवाल कोअर कमिटीला पाठवण्यात येईल. काही तालुक्यांत राष्ट्रवादी-शिवसेना, भाजप-शिवसेना किंवा राष्ट्रवादी-भाजप अशी संयोजनाने लढण्याचा विचार आहे.
KDMC News : कल्याण डोंबिवलीत सस्पेन्स वाढला, ठाकरेंचे नगरसेवक गायब? पडद्यामागे हालचालींना वेग
दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्र-राज्य शासनाच्या शेतकरी, युवक, महिलांसाठीच्या योजनांमुळे ग्रामीण भागात महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर लवकरच जागावाटप जाहीर होईल आणि यावर शिक्कामोर्तब पडेल. त्यामुळे येत्या काळात जिल्हा परिषदेबाबत आणखी काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
