पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ८५ जागा जिंकल्या. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा प्रभाव निवडणुकीत दिसून आला. मतदारांनी विकासाला पसंती दिली. भाजपची सत्ता पुन्हा एकदा शहरात स्थापन झाली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला. या निकालात भाजपने 85 जागांवर विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 37 आणि शिवसेनेला 6 जागांवर समाधान मानावे लागले. यापूर्वीच्या सर्व महापालिका निवडणुका लक्ष्मण जगताप यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडत होत्या. 2023 मध्ये त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होती. संपूर्ण शहरावर त्यांची पकड आणि संघटनशक्ती होती, हे वारंवार सिद्ध झाले आहे. तोच संघटनात्मक करिष्मा यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा दिसून आला.
2026 ची महापालिका निवडणूक चिंचवड मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून त्यांच्यावर संपूर्ण शहराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या संधीचे सोने करत शंकर जगताप यांनी भाजपची निर्विवाद सत्ता पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडमध्ये खेचून आणली. आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपाने आपला यशाचा ‘ग्राफ’ कायम राखला.
Bhiwandi Municipal Election Result 2026 : भिवंडी महापालिकेचा A टू Z निकाल इथे वाचा, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी
निकालानुसार चिंचवड मतदारसंघातून भाजपाने 39 जागांवर विजय मिळवला, भोसरी मतदारसंघात 35 तर पिंपरी मतदारसंघात 12 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. या यशामध्ये शंकर जगताप यांच्या प्रभावी संघटनकौशल्याचा आणि नियोजनबद्ध प्रचाराचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होते.
BMC Election Result 2026 : मुंबई महापालिकेत तख्तापलट, वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण A टू Z यादी
“लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होती. त्यांची उणीव आम्हाला नक्कीच जाणवत होती. मात्र त्यांनी दिलेले विचार आणि शहराचा विकास हेच अंतिम ध्येय मानून आम्ही काम केले. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील हा विजय सुज्ञ मतदारांचा विजय आहे. विकासाला विरोधाची झालर चढवण्याचा प्रयत्न झाला, मात्र मतदारांनी तो ठामपणे फेटाळला. शहराच्या विकासाचे महत्त्व मतदारांना चांगलेच समजले आहे”, अशी प्रतिक्रिया शंकर जगताप यांनी दिली.
