Uddhav–Raj Thackeray Rally Shivaji Park : गेल्या 10 वर्षात मुंबई MMR रिजनमध्ये अदानी उद्योग समूहाला किती प्रकल्प मिळाले याची सविस्तर माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील सभेत दिली. संबंधित प्रकल्पांची माहिती मिळाल्यांनतर आपल्याला धक्का बसल्याचं राज ठाकरे म्हणाले.
“सरकारमध्ये बसलेले काही तरी करु शकतात का? काही करु शकत नाही. ही स्वकीयांची घात करणारी अवलाद ही पक्षांमध्येच नाही तर राजकीय पक्षांमध्येही आली आहे. सत्ता डोक्यात गेली आहे. हा भूगोल नीट समजून घ्या. वाढवण बंदरापासून वरती गुजरात आहे. त्यांचं आधीपासून डोक्यात आहे की, मुंबई ताब्यात घ्यायची. त्यासाठी आधी पालघर, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल. आधी माणसं तिकडे टाका. मराठी माणसांना फोडा. मतदारसंघ ताब्यात घ्या. मग आमदार, खासदार, नगसेसवक आमचा. हे सगळं करुन मुंबई गुजरातला जोडायचा प्लॅन आहे’, असा मोठा आरोप राज ठाकरे यांनी केला. “गौतम अदानी 2014 मध्ये फक्त एका ठिकाणी उद्योग करत होते. पण 2025 ला त्यांचे किती उद्योग आहेत? मी तुम्हाला मुंबई MMR रिजनचे प्रोजेक्ट सांगतो”, असं म्हणत राज ठाकरे यांनी यादी वाचून दाखवली.
ठाकरेंनुसार अदानींना कोणकोणते प्रोजेक्ट मुंबईत MMR रिजनमध्ये मिळाले?
- 29 जून 2018 रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर ताब्यात, मुंबई वीज पुरवठा क्षेत्रात प्रवेश.
- एप्रिल 2019 नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात केली.
- एप्रिल 2021 मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात,
- अंधेरी पश्चिम येथील आरटीओची जमीन अदानी यांना 5 हजार कोटींना देण्यात आली.
- ऐरोली येथील डेटा सेंटरसाठी 92 एकर जमीन 1500 कोटींमध्ये,
- धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना,
- महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी 13,888 कोटींचं कंत्राट, भांडूप, कल्याण इथेही मीटर्स बसवणार.
- मुंबई आणि नवी मुंबईत हायपरस्केल डेटा सेंटर्स उभारणार.
- महाराष्ट्र सरकारशी 50 हजार कोटींचे सामंजस्य करार.
- मेट्रो, मनोरेल यांना अदांनींचा वीज पुरवठा.
- साताक्रुझ आणि विले पार्ले परिसरात केंद्र सरकारच्या विमान सुरक्षित जागांवर 80 हजार झोपडपट्टींचा पुनर्विकास अदानी करणार.
- पनवेवमध्ये टॉवर सेमिकंडक्टर कंपनी आणि अदानी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्यता. 10 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा अंदाज.
- धारावी पुनर्विकास प्रकल्पबाधितांसाठी देवनारमध्ये 124 एकर जमीन मिळाली.
- मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणी पुरवठ्यासाठी वसई खाडी जवळील 209 कांदळवने तोडण्यास अदानींना मुंबई हायकोर्टाकडून
- MIDC ने तळोजा येथे 400 एकर नंतर 159 एकर जमीन दिली.
- वांद्रे रिक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्पासाठी 24 एकर जमीन 30 हजार कोटींमध्ये मिळाला.
- पालघर डहाणू येथे अदानी वीज प्रकल्प.
- अदानी नवी मुंबईत सेमीकंडक्टर प्रकल्प सुरु करार.
- वसईत तुंगारेश्वर अभायरण्यातील जमीन अदानी इलेक्ट्रिसीटीला.
- टिटवाळा, मोहने, आंबिवली, शहाड येथे अदानी सिमेंट फॅक्टऱ्या.
- वाढवण येथे बंदर उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक. महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार. वाढवण येथे विमानतळ उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक.
