Nandurbar Prathamesh Chaudhary : नंदुरबार नगरपालिकेमध्ये माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश हिरालाल चौधरी हे उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.
नगराध्यक्षपदी रत्ना रघुवंशी विजयी
नंदुरबारचे सुपुत्र माजी आ.शिरीष चौधरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या सेनेत प्रवेश केला. अमळनेर नगपरिषद निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षसह 12 नगरसेवक निवडून आणले. तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र प्रथमेश शिरीष चौधरी हे नंदुरबार नगरपालिकेमधून शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते. नंदुरबार पालिकेत नगराध्यक्षपदी शिंदे शिवसेनेच्या रत्ना रघुवंशी या विजयी झाल्या. तर 41 जागांपैकी 29 शिंदे शिवसेना, 8 भाजपा व 4 जागांवर एमआयएमने विजय मिळवला होता. नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत पदांसाठी आज विशेष सभेचे आयोजन पालिका सभागृहात करण्यात आलं होतं.
BMC Election : लोकसभा-विधानसभेला पराभव, महापालिकेत विजयाची वाट सोपी की बिकट? यामिनी जाधवांबाबत मटा ऑनलाईन पोलमध्ये 75 टक्के युजर्स म्हणतात…
अमेरिकेतून MBA पर्यंतचं शिक्षण
उपनगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेतर्फे प्रथमेश चौधरी यांचा तर भाजपातर्फे नीता सतीश मराठे यांनी उमेदवारी दाखल केली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात प्रथमेश चौधरी यांना 30 तर नीता मराठे यांना आठ मते मिळाली. या निवडणुकीत एमआयएम तटस्थ राहिला. पीठासन अधिकारी यांनी प्रथमेश चौधरी यांना विजयी जाहीर केले. चौधरी कुटुंबातील तिसऱ्या पिढीने राजकारणात प्रवेश करत उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहे. प्रथमेश चौधरी यांनी अमेरिकेतून MBA पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. निवडीनंतर डीजे तसेच ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष करण्यात आला.
