Latur Municipal Election : आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येतंय, की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं
रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येतंय, की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या (लातूर) शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काहीच शंका नाही, असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं.
Maharashtra Politics : भाजपचे एका जागेसाठी ‘चुकून’ दोघींना AB फॉर्म; बंडखोर कमळावर, अधिकृत उमेदवार ‘बॅटबॉल’वर, चर्चा मात्र पक्षाच्या खेळीची
हर्षवर्धन सकपाळ काय म्हणाले?
“स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. आज त्यांच्याबद्दल हे सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरात येऊन बरळून जातात की साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख साहेबांचं लातूरशी असलेलं नातं. लातूरच्या कर्तृत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा!” असा इशारा हर्षवर्धन सकपाळ यांनी दिला.
Vikrant Patil : ‘लाडक्या बहिणी’साठी भाजप आमदाराने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यायला लावली? हिमतीची राज्यभर चर्चा
अमित देशमुख काय म्हणाले?
“भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या संदर्भाने जे विधान केलंय, ते अत्यंत दुर्दैवी दुःखदायक आहे, त्यांच्याकडून आणि भारतीय जनता पक्षाकडूनही अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, त्यांच्या या वक्तव्यामुळे आम्हा सर्व लातूरकरांची मने दुखावली आहेत. आम्ही त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत.” अशा भावना अमित देशमुख यांनी व्यक्त केल्या.
BMC Election 2026 | मुंबई महापालिकेवर कुणाचा महापौर बसणार? दादरकरांना काय वाटतं?
