Mangesh Kalokhe Murder Case : खोपोली येथे शिंदेसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर त्यांच्या मुलींची हृदय पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया समोर आली आहे.
कुटुंबीयांचा धक्कादायक खुलासा
आतापर्यंत मंगेश काळोखे हत्याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या विनय चव्हाण या मारेकऱ्याला खोपोली पोलिसांनी अटक केली नसल्याची खंत काळोखे कुटुंबानी व्यक्त केली आहे. मंगेश काळोखे यांच्या दोन्ही मुलींना आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिली होती, याबाबतीतील धक्कादायक खुलासा त्यांनी केल्यानं या Mangesh Kalokhe Murder प्रकरणात पुन्हा राजकीय वळण येण्याची शक्यता आहे.
Dhule Crime : आमचे पॅनल का फोडताय?, अर्ज माघारीतून गोळीबार, भाजप उमेदवाराच्या दीराला गोळी लागली; धुळ्यात खळबळ
त्यांना शेवटचं बघितलं नाही
‘माझ्या पप्पांचा चेहरा सुद्धा आम्हाला दाखवला नाही, त्यांची काय चुक होती. रुग्णालयातून आणलं त्यांना तेव्हाही ते कापडातच होते. त्यांचा शेवटचा चेहरा सुद्धा आम्हाला बघता आला नाही. एवढं त्यांना निर्घृणपणे मारलं होतं. माझ्या बाबांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे’, अशी मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या मुलींनी केली. मुलींची ही मागणी ऐकून उपस्थितीतांचे डोळे पाणावले.
Akola Crime : तीन वर्षांपासून समलिंगी संबंध, ‘त्या’ रात्रीच्या घटनेने नात्याला तडा, नितेशने अमोलचा जीव घेतला, महाराष्ट्र हादरला
मला बाय केलं आणि…
मयत मंगेश काळोखे यांची छोटी मुलगी आर्या सातवीला आहे. तर मोठी मुलगी वैष्णवी ही दहावीला आहे. या दोन्ही मुली वडिलांच्या निर्घृण हत्येनंतर भयभीत झालेल्या दिसल्या. आर्या या छोट्या मुलीला शाळेत सोडून घरी परत येत असताना मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या झाली होती. ‘माझे बाबा मला शाळेत सोडायला गेले होते. पण, नंतर ते दिसले नाही. मला बाय केलं आणि निघून गेले. पण, ते परत कधी आालेच नाही. माझ्या बाबांना मारणाऱ्यांना फाशीच झाली पाहिजे’, असं आर्याने म्हटलं आहे.
