राज्यात सत्तेत असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुण्यात एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. दोघांमधील संघर्ष आतापासूनच दिसायला लागला आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिलेदाराने भाजपचा उल्लेख करत गंभीर दावा केला आहे.
या वक्तव्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी जोरदार पलटवार केला. “भाजप ईव्हीएम सेट केल्याशिवाय सव्वाशे पार करू शकणार नाही. भाजपला १०० जागा मिळवणंही कठीण आहे. भाजपने सव्वाशे पार केल्यास मी राजकारण सोडेन,” असा थेट दावा बहल यांनी केला.
भाजप सध्या फोडाफोडीचं राजकारण करत असून पक्षात येणाऱ्या लोकांना ‘मशिनमधून आपोआप दोन ते अडीच हजार मते मिळतील’ असा विश्वास दिला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. “ज्यांना स्वतःवर विश्वास नाही, तेच भाजपमध्ये गेले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता येईल,” असा विश्वास बहल यांनी व्यक्त केला.
एकूणच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी थेट लढत रंगण्याची चिन्हं असून, आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार का? याबाबत अद्याप अनिश्चितताच कायम आहे.
Pune News : नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यात हमरी-तुमरी, शिवसेनेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी
योगेश बहल नेमकं काय म्हणाले?
“आता त्यांनी ईव्हीएम सेट केलंय का? हे त्यांनाच माहिती. पण ते 125 जागा पार करणार म्हणतात. माझं त्यांना आताच आव्हान आहे. त्यांनी 125 जागा पार केल्या तर कायमचं राजकारण सोडून टाकू. 125 काय 100 जागा मिळवणंही त्यांना अवघड जाईल. एवढं सोपं काम थोडी आहे. निकालच दाखवले आणि जनता दाखवेल काय होणार आहे. वास्तविक पाहता ते फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. त्यामध्ये ते लोकांना असं सांगत आहेत की, मशीनमध्ये दोन-अडीच हजार मते आपोआप मिळतील, बाकीची सगळी मदत करु, तुम्ही आमच्याकडे या. असं सगळं सुरु आहे”, असा धक्कादायक दावा योगेश बहल यांनी केला.
Pune MNS : पुण्यात मनसेमध्ये काय चाललंय? आघाडीसाठी 2 दिवसात तीन वेळेस यु-टर्न
“जी लोकं आम्हाला सोडून गेली आहेत त्यांना स्वत:वर विश्वास नाही. त्यांना असं वाटतं की, आपण राष्ट्रवादीकडून निवडून येऊ शकत नाही. अजित दादा यांच्यासारखा उमदा नेता उभ्या महाराष्ट्रात मिळणार नाही. अशा नेत्याला सोडून पळून जावून काय साध्य करणार? जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असा पलटवार योगेश बहल यांनी भाजपवर केला.
