पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबियांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यांना पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचंड मोठ्या हालचाली सुरु आहेत. प्रत्येक पक्षाच्या गोटात उमेदवार ठरविणे, युती आणि आघाडीबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत विचार विनिमय करणे, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे हे सर्व कामे सुरु आहेत. इथे प्रत्येक पक्षाचे इच्छुक उमेदवार आपापली ताकद लावताना दिसत आहेत. तसेच प्रत्येक पक्षाकडून मोठी रणनीती आखली जात आहे. अर्ज भरण्याची शवेटची तारीख आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी उमेदवार निश्चित करणं आणि युती-आघाडीच्या टप्प्यांची चर्चा करणं ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यावर येताना दिसत आहे. या घडामोडी सुरु असतानाच पुणे गँगवॉर प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबियातील सदस्यांना उमेदवारी अर्जा दाखल करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.
नातू आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी कुख्यात बंडू आंदेकरसह त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. त्यानुसार, तिघे आरोपी आज (शनिवारी) पोलीस बंदोबस्तात आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी कोणतीही मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक भाषणे करू नये, अशी ताकीदही न्यायालयाने आरोपींना दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात अटक आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याचा 5 सप्टेंबर रोजी नाना पेठेत गोळ्या घालून खून करण्यात आला. या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ७०), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), सोनाली वनराज आंदेकर (वय ३६, तिघे रा. नाना पेठ) यांच्यासह पंधरा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामध्ये बंडू आंदेकरसह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि वनराजची पत्नी सोनाली यांना निवडणूक लढविण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. पक्षाच्या आदेशानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशा मागणीचा अर्ज आरोपींच्या वतीने वकील मिून चव्हाण यांनी केला. ‘निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे,’ हे तत्व अधोरेखित करत न्यायालयाने आरोपींना पोलीस बंदोबस्तात अर्ज भरण्याची मुभा दिली. मात्र, अर्ज भरण्यासाठी जाताना मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी आणि सार्वजनिक ठिकाणी भाषणे करू नये, अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा