‘स्वतःची खुर्ची वाचवू शकले नाही, ते सिल्लोड काय बघणार?’ अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंवर ‘सर्जिकल स्ट्राईक’
सिल्लोड बालेकिल्ला
सिल्लोड नगरपरिषदेत अब्दुल सत्तारांचे पुत्र अब्दुल समीर यांनी ३,५०० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने नगराध्यक्षपदावर कब्जा मिळवला आहे. सत्तारांच्या पॅनेलने नगरसेवक पदाच्या जागांवरही वर्चस्व गाजवत सिल्लोड हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.
‘तुमचं भोकरदनमध्येच बिघडवलं!’
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीकेची तोफ डागली. सत्तार म्हणाले, “सिल्लोडमध्ये येऊन आमचं काहीही बिघडवू शकत नाही, हे त्यांना आता समजलं असेल. आम्ही तर त्यांच्या भोकरदन आणि फुलंब्रीमध्ये घुसून त्यांचं गणित बिघडवून दाखवलंय. ज्यांना स्वतःच्या गावाची खुर्ची वाचवता आली नाही, ते सिल्लोडचा विचार करत होते.” भोकरदन हा रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला असून कन्नडमध्ये त्यांची कन्या संजना जाधव या आमदार असूनही या ठिकाणीही पराभवाचा सामना करावा लागल्याने सत्तारांनी हा खोचक टोला लगावला आहे.
Kandri Kanhan Election Result: प्रभागात केवळ 256 मतदार, 178 जणांनी बटन दाबलं; 3 उमेदवारांच्या लढतीत ‘ट्विस्ट’च ‘ट्विस्ट’!
जुना वाद, नवी ठिणगी
सत्तार आणि दानवे यांच्यातील राजकीय वैर जुनेच आहे. लोकसभा निवडणुकीत दानवे यांच्या पराभवासाठी सत्तारांनी ‘भूमिका’ घेतल्याचा आरोप भाजप समर्थकांनी केला होता. त्यानंतर दानवेंनी सत्तारांवर ‘बोगस मतदान’ आणि ‘सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती’ असल्याचे गंभीर आरोप केले होते. आजच्या विजयाने सत्तारांनी त्या सर्व आरोपांना निकालातून उत्तर दिल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील निकालांचे चित्र
राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. एकूण २८८ संस्थांपैकी साधारण आकडेवारी खालीलप्रमाणे
- भाजप: ११७ जागा (सर्वात मोठा पक्ष)
- शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ५३ जागा
- राष्ट्रवादी (अजित पवार गट): ३७ जागा
- काँग्रेस: २८ जागा
- शिवसेना (UBT) व इतर: ५३ जागा.
