सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सध्या चर्चेला कारण ठरला आहे. कारण या निवडणुकीत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण भाजपचे संजय काका पाटील यांनी या नगर परिषदेवर विजयाचा गुलाल उधळला आहे.
“आम्ही केलेली सगळी कामे आता जनतेपर्यंत पोहोचवू. आम्ही नेहमी कर्तव्याच्या भावनेतून काम करत गेलो. पण पलीकडून नेहमी फसवण्याच्या भावना आल्या. समोरच्याने फोटो वरून राजकारण केलं, रोहित पाटील यांच्या आईंना आर. आर. आबा यांच्यानंतर उमेदवारी दिली गेली. त्यात संजय पाटलाचा रोल मोठा होता. त्या ताकदीने आम्ही वहिनींचे नाव पुढे आणलं होतं. त्यांच्या घरात कुणी – कुणी उमेदवारी मागितली होती. आईने शरद पवारांना काय काय सांगितलं होतं? हे आता मला सगळं काढायला लावू नका”, असा इशारा त्यांनी दिला.
Ajit Pawar : निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरला, अजित पवार म्हणाले, आम्ही कमीच जागा लढवल्या अन्…
“आर. आर. पाटील हे तासगाव मतदारसंघातून निवडून गेले होते. ते कसे गेले हे आज काढायची गरज नाही. धार्मिक गुलामगिरीत तालुक्यातील लोकांना ठेवण्याचे जे काम सुरू आहे ते आता आम्ही चालू देणार नाही. चाळीस वर्षे आमदारकी असताना तुम्ही कसे निवडून आला, कोणासोबत बसला, कोणती लोकं घेतली, हे सर्व पुराव्यांशी आम्ही पुढील काळात काढू. या निवडणुकीत आमच्यावर खोटे नाटे आरोप केले गेले. विरोधकांनी सहानुभूती घेण्यासाठी आमच्यावर चुकीचे आरोप केले. तालुक्यात बाहेरून कोणते गुंड आणले, कोणाला मारले हे सर्व माहीत आहे. आम्ही धाडसी माणसं आहे, गांX माणसं नाहीत. तसेच तासगावच्या नगरपरिषद निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर विरोधकांनी केला”, असा आरोप संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर केलेत.
Satara Election Result : साताऱ्यात भाजपची घोडदौड! विधानसभेनंतर रामराजेंना पुन्हा धक्का, 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग
दरम्यान तासगाव नगर परिषदेमध्ये संजयकाका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीची सत्ता आली आहे. एकूण 24 नगरसेवकांपैकी 13 नगरसेवक संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीची निवडून आले आहेत. तसेच विजया पाटील या त्यांच्या नगराध्यक्ष झाल्या आहेत. आमदार रोहित पाटील यांच्या गटाला त्यांनी जोरदार शह देत विजयाचा गुलाल उधळला.
