अंबाजोगाईत पोलिसांनी मोठी कारवाई केली. रविवार पेठ परिसरातील गोदामातून स्विफ्ट कारसह साडेपाच लाखांचा अवैध गुटखा जप्त केला. एका आरोपीला…
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ भागात एका गोदामात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आहे. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी रात्रीच्या वेळी अचानक छापा टाकला. यावेळी, तिथे उभ्या असलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमध्ये (क्रमांक MH 14 BR 1606) सुमारे दीड लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा आढळून आला. या कारवाईत एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यात गुटख्यासोबतच एका स्विफ्ट डिझायर कारचाही समावेश आहे.
Satara Crime: पाचगणीमध्ये पुन्हा ड्रग्स कारवाई! पाच लाखांचे कोकेन जप्त, दहा तस्कर ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी वहीद मणियार नावाच्या एका आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. पोलिसांना संशय आहे की, वहीद अनेक दिवसांपासून गुटख्याची अवैध तस्करी करत होता आणि ते त्याच्या मागावर होते. मात्र, ज्या व्यक्तीच्या गोदामात हा माल साठवला होता, तो इरफान बागवान नावाचा आरोपी पोलिसांना चकवा देऊन अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
अंबाजोगाई शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपी इरफान बागवान याचा शोध घेण्यासाठी तपास सुरु आहे. या कारवाईमुळे शहरात अवैध गुटखा आणि तंबाखू विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा अवैध धंद्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी. तसेच, पोलिसांनी पुढील काळात अशा कारवाईंना वेग देण्याचेही संकेत दिले आहेत.
