Pune Maval Assault and Killed Minor Girl : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे.
नेमकी घटना काय घडली?
काल शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही चिमुकली घरातून बेपत्ता झाली होती. रात्री उशिरा आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी घरी नसल्याचं लक्षात आलं. मुलीचे वडील गेल्या आठ दिवसांपासून कामानिमित्त पुण्यात गेले होते, तर आई जवळच्या कंपनीत काम करते. त्यामुळे चिमुकली अनेकदा घरात एकटीच असायची. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने चिमुकलीला घराजवळच काही मीटर अंतरावर नेले आणि तिच्यावर बलात्कार करून गळा दाबून तिची हत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रात्री दीडच्या सुमारास शिरगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली होती. पोलीस आरोपीचा शोध घेत होते.
Kolhapur Crime: माझी बॉडी पाण्याबाहेर यायला वेळ लागेल; कोल्हापुरात प्रसिद्ध डॉक्टरने मृत्यूला कवटाळले, शेवटचा धक्कादायक मेसेज समोर
आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीला ताब्यात घेतलं. चौकशीतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हत्या झालेल्या चिमुकलीचे कुटुंब झारखंड येथील असून आरोपी हा पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. दोन्ही कुटुंबे रोजगारासाठी मावळ परिसरात वास्तव्यास होती.
Ajit Pawar: रंग माझा वेगळा! फडणवीस- शिंदे RSS च्या रेशीमबागेत अभिवादन करायला गेले, पण अजित पवारांचा जुनाच बाणा कायम
पुण्यात धक्कादायक घटना
जुन्या भांडणाचा राग मनात धरून तीन जणांनी मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाकीब छोटू शेख असं 25 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी संजय गांधीनगर, पिंपरी येथे घडली. प्रेम प्रकाश डोंगरे (मिलिंदनगर, पिंपरी) आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून शाकीबच्या पोटात चाकू खुपसून त्याचा जीव घेतला. या प्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी प्रेम डोंगरे याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम डोंगरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
