• Fri. Jun 12th, 2026

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मृती मंदिराला भेट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 14, 2025
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मृती मंदिराला भेट – महासंवाद

    नागपूर, दि. १४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग

    येथील स्मृती मंदिर येथे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक प.पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

    यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्रिमंडळ व विधिमंडळातील सदस्य यांनीही स्मृती स्थळाचे दर्शन घेतले. डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे व्यवस्थाप्रमुख व ज्येष्ठ प्रचारक विकास तेलंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह संपर्कप्रमुख सुनील देशपांडे, महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, स्मारक समितीचे सचिव अभय अग्निहोत्री तसेच स्वयंसेवक उपस्थित होते.

    00000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed