धुळे-सोलापूर महारामार्गावर मांजरसुबा घाटात आज संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. मांजरसुबा घाटात डिझेलचा टँकर पलटी झाला. त्यानंतर त्याचा स्फोट झाल्याची माहिती आहेत.
धुळे-सोलापूर महामार्गावर मांजरसुबा घाटात अचानक टँकर पलटी झाला. यानंतर पाठीमागच्या काही गाड्यांची धडक झाल्याची माहिती समोर येत आहे. या दरम्यान अचानक स्फोट झाल्याची माहिती आहे. टँकर पलटी झाल्यानंतर गाडीतील सर्व डिझेल रस्त्यावर पडलं. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण रस्त्यावर आग भडकली. दरम्यान, या काळात स्थानिक नागरिकांनी टँकरच्या चालक आणि क्लिनरला सुखरुप बाहेर काढलं. त्यामुळे ते सुदैवाने बचावले आहेत.
नेमकं काय घडलं?
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त टँकर हा मांजरसुंबा घाटातून जात असताना घाटातील अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे हा टँकर पलटी झाला. घाटाचा रस्ता असल्यामुळे हा डिझेलने भरलेला टँकर पलटी झाल्यानंतर काही अंतरापर्यंत घसरत गेला. यामुळे गाडीतील डिझेल रस्त्यावर पडले. या दरम्यान मोठा स्फोट झाला. या स्फोटनंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला. ही आग 100 ते 200 मीटरपर्यंत पसरली. घटनेनंतर रस्त्यावर आगीचे मोठे लोट बघायला मिळाले.
प्रसाद लाड यांना सभागृहात बोलताना अचानक विजेचा शॉक लागला अन्…, पाहा नेमकं काय घडलं?
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेवेळी पाठीमागून आलेल्या वाहनांची धडक झाल्याची माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरीक मदतीसाठी धावले. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आता समोर येत आहे.
PM Modi Cabinet Decision : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठा निर्णय, 2027 मध्ये देशभरात 2 टप्प्यात जनगणना होणार, त्यानंतर…
धुळे-सोलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
या अपघातानंतर धुळे-सोलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. धुळे-सोलापूर महामार्गाच्या मध्यभागातच ही घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, या अपघातात इतर काही लोकांना इजा पोहोचली आहे का? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
