Thane Ghodbunder Road : ठाण्यातील गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीमुळे तेथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. अवजड वाहने पर्यायी मार्गांवर वळवण्यात येणार आहेत. अशात वीकेंडला नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीची शक्यता आहे. या मार्गावरुन प्रवास करताना पर्यायी मार्ग पाहूनच नागरिकांनी प्रवास करावा.
शुक्रवारपासून पुन्हा वाहतूक बदल
शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता कासारवडवली वाहतूक उपविभाग हद्दीत गायमुख नीराकेंद्र, काजूपाडा ते फाउंटन हॉटेलदरम्यान डीबीएम, मास्टिक पद्धतीने काम केले जाणार आहे. त्यामुळे रविवार, 14 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्याबाबत ठाणे वाहतूक शाखेने अधिसूचना जारी केली आहे.
घोडबंदर रोडवरील कामांना 15 डिसेंबरची डेडलाईन, प्रताप सरनाईकांनी दिली महत्त्वाची सूचना; कोणत्या प्रकल्पांचा समावेश?
रस्त्याच्या दुरुस्तीदरम्यान कुठून-कशी वळवणार वाहतूक?
मुंबई, जंक्शनजवळून ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापुरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने वाय जंक्शन येथून सरळ नाशिक रोडने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा तसेच कापुरबावडी उजवीकडे वळण घेऊन कशेळी, अंजुरफाटा या पर्यायी मार्गाने जाण्याचे आदेश वाहतूक शाखेने अधिसुचनेद्वारे दिले आहेत.
‘या’ वाहनांना प्रवेशबंदी
तर मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडकडे येणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी केली आहे. ही वाहने खारेगाव खाडीब्रिज खालून खारेगाव टोलनाका माणकोली, अंजूरफाटामार्गे इच्छितस्थळी जाणार आहेत.
Avinash Jadhav On Thane Traffic : ‘या’ बाबामुळे लागली ठाण्याची वाट, अविनाश जाधवांचा रोख कुणाकडे?
घोडबंदर रोडवर वाहतूककोंडी
दरम्यान, ठाणे शहरात अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूककोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर भागातील रहिवाशांकडून अनेकदा संताप व्यक्त करण्यात येतो. याविरोधात घोडबंदर पट्ट्यातील गृहसंकुलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, पालघर आणि नवी मुंबई पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेत या बैठकीत अवजड वाहतुकीवर नियंत्रणाच्या सूचना दिल्या होत्या. आता घोडबंदरवरील गायमुख रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्यानंतर या भागातील नागरिकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
