• Thu. Jun 18th, 2026

    नगरपरिषद निवडणूक मतमोजणीमुळे एमपीएससी गट ‘ब’ व ‘क’ ची परीक्षा ४ व ११ जानेवारीला – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 8, 2025
    नगरपरिषद निवडणूक मतमोजणीमुळे एमपीएससी गट ‘ब’ व ‘क’ ची परीक्षा ४ व ११ जानेवारीला – महासंवाद




    मुंबई,दि, ८: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२५ या २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती, मात्र नगर परिषद निवडणुकांच्या मतमोजणीसाठी परीक्षा केंद्र व मतमोजणीचे ठिकाण यातील कमी अंतर,कर्मचाऱ्यांची कमतरता, वाहतूक कोंडी व इतर महत्त्वाच्या कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला आहे, असे आयोगाने कळवले आहे.

    परीक्षांचे सुधारित दिनांक

    गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा       ४ जानेवारी २०२६ आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.

    ०००

    राजू धोत्रे/विसंअ







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed